शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..."

By अजित मांडके | Published: February 07, 2024 9:48 PM

शरद पवारांना राजकीयदृष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला.

ठाणे : त्यांनी घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला लागवला. त्याबळावर आम्ही पुन्हा जोमाने भरारी घेऊ, असेही ते पुढे म्हणाले. बुधवारी रात्री आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांचा फोटो असलेले नवीन पक्षाचे पोस्टर ही जारी केले.

निवडणूक आयोगाने 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' असे नाव जाहीर केले आहे. मुळात हा पक्षच शरद पवार यांचा आहे. हे आता नियतीने ही दाखवून दिले. आमच्याकडून त्यांनी घड्याळ चोरले, पण मनगट आमच्याकडे राहिले, त्यांच्यात दम असेल तर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार असे नाव लावावे, असे आव्हान ही त्यांनी यावेळी दिले.

निवडणूक आयोगाचा निर्णय हा दुट्टपी आणि संभ्रम निर्माण करणारा आहे. निवडणूक आयोग खोटे बोलत आहे. ते विरोधाभास दर्शवत आहे.  निवडणुक आयोग नाही तर कटपुत्तली आहे. शरद पवार यांना राजकीयदुष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तुम्ही पाकीटमारासारखे घड्याळ चोरले आहे. पण मनगट तोडायला विसरले. ते मनगट शरद पवार यांचे आहे. ते नव्या जोमाने उभे राहतील. यांनी  सावली देणाऱ्या वटवृक्षावर यांनी घाव घातला. यात सगळ्यांचा हातभार लागला आहे.

ते शरद पवार यांचा राजकीयदृष्टया गळा घोटायला निघाले. पण नियती त्यांना येत्या काळात दाखवून देईल, शरद पवार काय आहेत. ८४ व्या वर्षी शरद पवारांना जे छळतात त्यांचा बदला जनता घेईल. हम लडेंगे और जितेंगे भी! असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पोस्टर प्रसार माध्यमासमोर जाहीर केले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार