ऑनलाइन लोकमतबीड, दि. २२ : जिल्हा राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत १५ दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मिटले आहेत. सर्वनेते एकजुटीने काम करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकीत बंडखोरी, आघाड्या होणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती करतानाच सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी असल्याने राष्ट्रवादीलाच चांगले यश येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटबांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरु आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे, आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह ंपंडित, माजी आ. उषा दराडे, सय्यद सलीम, नंदकिशोर मुंदडा, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, रवींद्र क्षीरसागर, अॅड. शेख शफीक, अॅड. हेमा पिंपळे, परमेश्वर सातपुते यांची उपस्थिती होती. तटकरे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या संदर्भाने वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. सत्ताधारी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात करसवलती दिल्या होत्या, आता मात्र करात वाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक महागाईत होरपळून निघत आहे. मराठा आरक्षण, डान्सबार बंदीचे निर्णय न्यायालयात टिकत नाहीत. सरकार तज्ज्ञ वकिलांमार्फ त न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली. स्मार्टसिटी, वॉटर ग्रीड या घोषणा हवेतच असून स्मार्टसिटीसाठी दोन वर्षांत एक रुपया तरी दिला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.मराठा क्रांती मोर्चांबाबत सरकार बेफिकीरकोपर्डी (ता. पाथर्डी) येथील घटनेनंतर ठिकठिकाणी मराठा समाजाचे क्रांती मोर्चे निघत आहेत. समाजाच्या भावना तीव्र आहेत. लाखोंच्या संख्येने महिला व युवती सहभागी होत आहेत. शिस्तबद्धपणे निघणाऱ्या या मोर्चांची सरकारकडून आणखी गांभीर्याने नोंद घेण्यात आली नाही, असा टोला तटकरेंनी लगावला. अॅट्रॉसिटी अॅक्टच्या संदर्भात खा. पवार यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या कायद्यातील काही कलमांचा कमी- अधिक वापर होत असल्याने त्यात सुधारणा करता येईल का? याचा सरकारने विचार करावा, अशी मागणी पक्षाने केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीत बंडखोरी होणार नाही - तटकरेंना विश्वास
By admin | Published: September 22, 2016 6:29 PM