मुंबई - केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता पत्र युद्ध रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून मोदी सरकारवर केलेल्या टीकेनंतर भाजपाने त्यांना जय श्री राम लिहून दहा लाख पत्रे पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा लिहून राष्ट्रवादी काँग्रेस मोदींना २० लाख पत्रे पाठवणार आहे.
काल राज्यसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. या शपथविधीवेळी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली होती . त्यावरून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांना सभागृहात अशा घोषणा देऊ नये, अशी समज दिली होती. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना २० लाख पत्रे पाठवण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावर भाजपाने जोरदार टीका केली होती. यानंतर आता भाजपा युवा मोर्चाकडून शरद पवारांचा पत्रांच्या माध्यमातून निषेध करण्याची घोषणा करण्याची घोषणा करण्यात आली होती. भाजपा युवा मोर्चाच्यावतीने पवारांना जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र त्यांच्या मुंबईस्थित सिल्व्हर ओक निवासस्थानी पाठवणार असल्याची माहिती भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी