शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

MLC ELETION : कमळाच्या साथीने कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:33 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांचा निकाल आज जाहीर झालाय.

रत्नागिरी : शिवसेनेवर नाराज असलेल्या भाजपाने केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळे यांना तब्बल ३१४ मतांनी पराभूत केले. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आज गुरुवारी मतमोजणी झाली. एकूण ९३८ मतांपैकी ६२0 मते राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांना तर ३0६ मते शिवसेनेचे उमेदवार राजीव साबळे यांना मिळाली. १२ मते बाद झाली. ३१४ मतांच्या आघाडीने तटकरे यांनी राष्ट्रवादीची ही जागा कायम राखली.

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपने युती केली होती. काँग्रेस, स्वाभिमान आणि शेकाप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. कागदावर युतीची मते अधिक होती. मात्र पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपासमोर उमेदवार उभा केल्यामुळे भाजपाच्या गोटात नाराजीचे वातावरण होते आणि भाजपाची मते राष्ट्रवादीला जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. या निवडणुकीत शिवसेनेची मते कायम राहिली असून, उर्वरित सर्वच मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याचे चित्र दिसत आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ३0३ मते होती तर भाजपची १६४ मते होती. मात्र प्रत्यक्षात शिवसेना उमेदवार साबळे यांना ३0६ मतेच मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्वत:ची मते १७४ इतकीच आहेत. उर्वरित ४४६ मते त्यांना इतरांच्या पाठिंब्यामुळे मिळाली आहेत.

काकांनंतर पुतण्याया मतदारसंघात आधी अनिल तटकरे विजयी झाले होते. आता त्यांचा पुतण्या अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ काकांकडून पुतण्याकडे गेला आहे.

कमळ फुलले, धनुष्यबाणाचीही साथराष्ट्रवादी काँग्रेसची मते ठाम राहिली. काँग्रेस, शेकाप, स्वाभिमान यांनी आपला शब्द कायम ठेवला. त्याचबरोबर काही ठिकाणी कमळ फुलले आणि काही ठिकाणी धनुष्यबाणाचीही साथ मिळाली, अशी बोलकी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.