ठाणे : कल्याणसह ठाण्याचे खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाविरोधात ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन येथे त्रस्त ठाणेकरांच्या सह्यांची मोहीम पक्षाने आखली होती. या मोहिमेत सुमारे साडेसात हजार प्रवाशांनी आपला सक्रि य सहभाग नोंदवला. या प्रवाशांनी आपल्या समस्याही लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडे दिल्या. आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे, आमदार निरंजन डावखरे, ठामपाचे विरोधी पक्षनेते संजय भोईर, महिला अध्यक्षा करिना दयालानी, युवक अध्यक्ष मंदार केणी आणि विद्यार्थी अध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबई-ठाणे रेल्वेला १०० वर्षे होऊन गेली. रोज लाखो प्रवासी या स्टेशनचा वापर करतात. त्यातून कोट्यवधी रु पये रेल्वेला मिळतात. मात्र, प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे. त्यातच ठाणेकरांनी या समस्या रेल्वे प्रशासनाकडे मांडून त्या सोडवण्यासाठी ज्या खासदारांची निवड केली आहे, ते अकार्यक्षम ठरले आहेत. म्हणूनच, राष्ट्रवादीने सोमवारी ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम येथे सकाळी ८ वाजता सह्यांची मोहीम घेतली होती. सुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही केला. या वेळी अनेक प्रवाशांनी आपल्या समस्याही या स्वाक्षरी वहीवर नोंदवल्या. ठाणे स्थानकात लिफ्टही वेळेत सुरू करण्यात येत नाहीत. फलाट क्र मांक १० वरील शौचालये बंद आहेत. स्टेशनमधील अनेक एटीव्हीएम यंत्रेही बंदावस्थेत आहेत. तिकीट खिडक्याही अनेकदा गर्दीच्या वेळीच बंद असतात, आदी समस्याही प्रवाशांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ठाण्याचे दोन्ही खासदार रेल्वेच्या समस्या सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. या अपयशी खासदारांचा त्रास ठाणेकरांना सोसावा लागत आहे, असे परांजपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.>प्रशासनामुळे कुचंबणासुमारे ७ हजार ७४९ त्रस्त ठाणेकरांनी सह्या करून आपल्या कैफियती मांडल्या. या सह्यांचे निवेदन आनंद परांजपे यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवले. या वेळी अकार्यक्षम खासदार आणि निगरगट्ट रेल्वे प्रशासनाचा धिक्कारही करण्यात आला.रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची कुचंबणा होत आहे. त्यांना अनेक असुविधांचा सामना करावा लागतो आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By admin | Published: July 19, 2016 3:06 AM