ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. 9 - गोंदियामधील दोन नगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी सुरुवात झाली आहे. 17 जागांसाठी काल ७३.१५ टक्के मतदान झाले होते. तिरोडा पालिकेतील 17 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 9 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, या ठिकाणी भाजापाने नगरध्यक्षपदी भाजपाने बाजी मारत पालिकेची सुत्रे आपल्याकडे ठेवली आहेत. भाजपाच्या सोनाली देशपांडे ह्या नगरध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. तिरोडामध्ये भाजपा-सेना युतीला 7 जागांवर समाधान मानावे लागले. 5 जागांवर भाजपा तर शिवसेना 2 आणि अपक्ष 1 जागांवर विजय झाले आहेत.