मुंबई : शिवसेना-भाजपामधील आत्मसन्मानाच्या नाटय़ावर अजून पडदा पडलेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनेही ‘वेगळं व्हायचंय’चा वग सुरू केला आहे. 144 जागांची आमची मागणी असताना काँग्रेसने 124 जागाच देऊ केल्या आहेत. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नसून येत्या 24 तासांत काँग्रेसने आघाडीबाबत अंतिम निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी स्पष्ट केले.
खासदार पटेल म्हणाले, राष्ट्रवादीला 144 जागा हव्या आहेत. तसा प्रस्तावही आमचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटून दिला होता.
तीच भूमिका आजही कायम आहे. मात्र काँग्रेसने आम्हाला 124 जागा देऊ केल्याचे आम्ही बाहेरून ऐकतो. पण ते आम्हाला मान्य नाही. तसे असेल तर आम्हाला पुढे जाताच येणार नाही, असे पटेल म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
124 जागा स्वीकारणार नाही- प्रफुल्ल पटेल
काँग्रेसने रविवारी सायंकाळी 6 र्पयत आघाडीबाबत निर्णय दिला नाही, तर सोमवारी सकाळी आम्ही त्यांच्या नेत्यांना भेटून आमची भूमिका स्पष्ट करू, असे सांगत खा. पटेल यांनी सोमवार सकाळर्पयत काँग्रेसला ‘ग्रेस टाइम’ दिला. तसेच 144 जागांवर अडून बसणार नाही, पण 124 जागा स्वीकारणार नाही, असे सांगत चर्चेला वाव ठेवला.
च्काँग्रेसने 144 जागा दिल्या नाहीत तर आघाडी तोडणार का, यावर ते म्हणाले, काँग्रेसने आम्हाला सन्मानजनक तोडगा द्यावा. काँग्रेस आमच्याशी चर्चाच करत नाही हे दुर्दैवी आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आघाडी कायम राहावी, अशी आमची भूमिका आहे. पण अर्ज भरणो सुरू झाले आहे.
च्अशावेळी आम्हाला वाट पाहायला वेळ नाही. 2क्क्4मध्ये आम्ही एवढय़ाच जागा लढविल्या होत्या. 2क्क्9मध्ये तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल दाखवत काँग्रेसने विधानसभेच्या जादा जागा मागून घेतल्या. या वेळी त्यांच्यापेक्षा लोकसभेच्या जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आम्हाला जादा जागा हव्या आहेत, असे पटेल म्हणाले.
काँग्रेसची 27क् उमेदवारांची यादी
अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे वेळ न दवडता राष्ट्रवादीसोबत जागावाटपाला अंतिम रूप दिले जावे, असे काँग्रेसला वाटते. आघाडी न करता एकटय़ाने निवडणूक लढण्याची वेळ आलीच तर आयत्या वेळी धावपळ होऊ नये यासाठी छाननी समितीने 27क् उमेदवारांची नावे तयार ठेवली. - वृत्त/8
दोन दिवस वाट पाहू -माणिकराव ठाकरे
च्जागा वाटपाबाबत अद्याप कोणताच निर्णय केंद्र व राज्यस्तरावर झालेला नाही. आघाडी करण्याची आमची भूमिका आहे. मात्र टाळी एका हाताने वाजत नाही.
च्किती जागांवर आघाडी करायची व नेमक्या कोणत्या जागा सोडायच्या तेही ठरत नाही. काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अपक्षांनाही उमेदवारी हवी आहे.
च्त्यांच्या जागांबाबत एकत्रपणो बोलणीच होत नाही. त्यामुळे आम्हीही राष्ट्रवादीच्या प्रतिसादाची दोनच दिवस वाटू पाहू. अन्यथा, आम्हालाही मार्ग मोकळा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.