जळगाव : जिल्हा परिषदेत भाजपा स्वबळावर ३३ जागा जिंकून बहुमताच्या जवळ पोहचला आहे. गेल्या २० वर्षांत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पहिल्यांदाच पुढे आला आहे. आता एका जागेसाठी शिवसेना की, अन्य कुणी याबाबतचा निर्णय आता मुंंबईत होईल.जिल्हा परिषदेत आतापर्यंत भाजपा- शिवसेना युतीची सत्ता होती. दरवेळी हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले आणि नंतर एकत्र आले. आता भाजपाला एका जागेसाठी अडले आहे. आता शिवसेना किंवा काँग्रेस असे दोन पर्याय भाजपासमोर आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर तालुक्याच्या व्यतिरिक्त या निवडणुकीत सक्रीय नव्हते. शिवाय खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील मतभेद हे जिल्ह्यासाठी नवीन नाहीत. त्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची नवी नियुक्ती. याचा कुठलाही परिणाम भाजपावर झाला नाही. भाजपाने मिळविलेले यश शिवसेनेसह सर्वांच्या भुवया उंचावणारे आहे. कारण स्वत: सेना स्वबळावर सत्ता स्थापण्याची भाषा करीत होती. पण गेल्या पंचवार्षिकमधील त्यांचा १४ जागांचा आकडा ते यावेळी पार करु शकले नाहीत. याशिवाय गेल्या वेळी राष्ट्रवादीला २० जागा होत्या. त्या आता १६ वर आल्या आहेत. तर १० जागांवरुन फक्त सहा जागांवर येत काँग्रेसचा सफाया झाला आहे. (प्रतिनिधी)जळगावपक्षजागाभाजपा३३शिवसेना१४काँग्रेस०४राष्ट्रवादी१६इतर00
भाजपा सत्तेच्या नजीक
By admin | Published: February 24, 2017 4:45 AM