पुणे - पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे ८० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८५ लाखांहून अधिक शेतकºयांना त्याची झळ पोहोचणार असल्याचा अहवाल कृषी आयुक्तालयाने राज्य सरकारला दिला आहे. या शेतक-यांचे साडेसात हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मराठवाड्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसली आहे.प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेची पाहणी करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. हाती आलेल्या माहितीनुसार सोयाबीन, कापूस, तूर, भात या पिकांना चांगलाच फटका बसला आहे. तर, मराठवाड्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ऊस वगळून १४० आणि ऊसासह क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्या पैकी ऊस पिक वगळून १३९.३८ व ऊस पिकासह १४१.२९ लाख हेक्टरवरील पेरणी आणि लागवड झाली आहे. त्यातील ऊस वगळून ८० ते ८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कापूस, उशीरा पेरलेला सोयाबीन, तूर, ज्वारी आणि भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे ४२.५८ लाख हेक्टर क्षेत्र असून, त्यातील अंदाजे २० लाख हेक्टरला फटका बसला आहे. तर, तूरीचा १२ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तूरीच्या उत्पादनात निम्म्याने घट होईल असा अंदाज आहे.२ हेक्टर खालील क्षेत्र असलेल्या शेतकºयांचे तब्बल ५ हजार ३०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे. तर, २ हेक्टरवरील क्षेत्र असलेल्या शेतकºयांना २ हजार २०० कोटींचा फटका बसल्याचे अहवालात म्हटले आहे. यात फळबागांचे १८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.५ जिल्ह्यांत तीव्र दुष्काळमराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी वगळून इतर भागाला मोठा फटका बसला आहे.चा-याच्याही दुष्काळाची शक्यताराज्यात डिसेंबरनंतर चा-याची तीव्र टंचाई होण्याची भीती कृषी अधिकाºयांनी वर्तवली. त्यामुळे पशुधन जगविण्यासाठी सरकारला मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून चारा आणावा लागेल. मराठवाड्यात चाºयाचा प्रश्न अधिक तीव्र असेल. विदर्र्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये चारा छावण्यांचे नियोजन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील तब्बल ८५ लाख शेतकरी दुष्काळाच्या फेऱ्यात, मराठवाड्याला सर्वाधिक झळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 5:23 AM