शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘नीट’च्या ‘केमिस्ट्री’त गडबड; ५ गुणांचे नुकसान; विद्यार्थी न्यायालयात धाव घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2019 3:06 AM

एनईईटी ५ मे रोजी झाली होती. त्यानंतर मेच्याच शेवटच्या आठवड्यात प्राथमिक उत्तर सूची वेबसाइटवर टाकण्यात आली. त्यावरील चूक उत्तरासंदर्भात ३१ मे पर्यंत आक्षेप घ्यायचे होते.

लातूर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एनईईटीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला. त्याच्या तासभर आधी अंतिम उत्तरसूची वेबसाईटवर टाकण्यात आली. त्यामध्ये केमिस्ट्री विषयातील आक्षेप न घेतलेल्या एका प्रश्नाचे उत्तर अंतिम सूचीत बदलण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले आहेत.

एनईईटी ५ मे रोजी झाली होती. त्यानंतर मेच्याच शेवटच्या आठवड्यात प्राथमिक उत्तर सूची वेबसाइटवर टाकण्यात आली. त्यावरील चूक उत्तरासंदर्भात ३१ मे पर्यंत आक्षेप घ्यायचे होते. परंतु, केमिस्ट्रीतील आक्षेप न घेतलेल्या एका प्रश्नाचे उत्तर अंतिम सूचीत बदलण्यात आले. प्राथमिक सुचीतीलच उत्तर बरोबर होते, असा दावा विद्यार्थी तसेच विषय तज्ज्ञांनी केला आहे. शिवाय, उत्तर सुची जारी झाल्यानंतर तासाभरातच निकाल हाती आल्याने विद्यार्थ्यांना आक्षेप घेता आलेले नाहीत.

केमिस्ट्रीच्या सेट क्रमांक पी-४ मधील प्रश्न क्र. १६३ च्या थर्मोडायनामिक्स पाठातील गणित होते. ज्याचे ‘मायनस ३० जे’ हे उत्तर बरोबर होते आणि तेच प्रथम उत्तर सुचीत नमूद केले होते. परंतु, अंतिम उत्तर सुचीत ‘३० जे’ हे उत्तर बरोबर दाखविण्यात आले आहे, जे की, चुकीचे आहे. केमिस्ट्री विषय तज्ज्ञ, प्राध्यापकांनीही नीटच्या अंतिम सुचीतील उत्तर चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, बायोलॉजीमधील तीन प्रश्नांवर आक्षेप घेण्यात आले होते. परंतु, त्या तिन्ही प्रश्नांवरील आक्षेप फेटाळले आहेत. सदरील तिन्ही प्रश्नांची उत्तरे एनसीईआरटीच्या पुस्तकातून लिहिण्यात आली होती. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्या पुस्तकातील दाव्याला मान्य केले नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले त्या प्रत्येक प्रश्नासाठी पाच गुण कमी झाले. या संदर्भात राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या सीईटी सेलचे संचालक प्रा.डी.के. देशमुख म्हणाले, पुस्तकातच चुकीचा संदर्भ असेल तर तो मान्य होणार नाही. शिवाय, नीटसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम आखून देण्यात आलेला आहे. त्यासाठी ठराविक अभ्यासक्रमाची पुस्तके उपयोगात आणावीत, असा नियम नाही. त्यामुळे त्या तीन प्रश्नांबाबत गल्लत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र केमिस्ट्रीच्या एका प्रश्नातील उत्तराची गडबड झाली आहे.

मेडिकल प्रवेश पर्सेंटाईलवर?‘नीट’च्या निकालात यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे गुणपत्रिकेत एकूण गुणांबरोबर प्रत्येक विषयाचे पर्सेंटाईल तसेच एकूण गुणांचे पर्सेंटाईल देण्यात आलेले आहे. त्यामुळे यापुढील प्रवेश प्रक्रिया पर्सेंटाईलवर होऊ शकेल. तसेच पूर्वीप्रमाणेच यावेळीही आॅल इंडिया रँक देण्यात आल्याने तोही प्रवेश प्रक्रियेचा मार्ग आहे. मात्र ७२० पैकी विद्याथर्यांना मिळालेले एकूण गुण नमूद केले असले तरी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे गुण न देता त्या विषयाचे पर्सेंटाईल गुणपत्रिकेत देण्यात आले आहेत.

न्यायालयात जाणार विद्यार्थी, पालक...केमिस्ट्रीच्या एका बरोबर उत्तराला अंतिम सुचीत चूक दर्शवून उत्तरात बदल केला आहे. एनसीआरटीच्या पुस्तकातील पृष्ठ क्र. १६६ व १८९ वर त्याचे उत्तर बरोबर आहे. त्यामुळे अन्याय झालेले विद्यार्थी व पालक न्यायालयात धाव घेणार आहेत. -प्रा. शिवराज मोटेगावकरअंतिम सूचीतील उत्तर चुकले

मायनस ३० जे हे उत्तर बरोबर असताना अंतिम उत्तर सूचीत चूक उत्तर देऊन विद्यार्थ्यांच्या पाच गुणांचे नुकसान झाले आहे. केमिस्ट्रीच्या कोणत्याही अभ्यासकाने अथवा विषय तज्ज्ञाने प्रॉब्लेम सोडविला तर उत्तर मायनस ३० जे हेच येईल. - प्रा. डी. के. देशमुख

कट ऑफ वाढण्याची शक्यतागेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा नीट परीक्षा सोपी होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची रॅकिंग वाढली आहे. परिणामी यंदा मेडिकल प्रवेशाचा कट आॅफ वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून केवळ एक ते दोन महिनेच नीट परीक्षेची तयारी केली जाते. त्यामुळे राज्यातील नीट परीक्षेत पात्र ठरणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपासूनच नीटची तयारी सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रवेश पूर्व परीक्षांच्या अभ्यासकांकडून सांगितले जात आहे.वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविलेच असल्यामुळे अभ्यास करावाच लागणार होता. कुटुंबात वैद्यकीय क्षेत्रातील वातावरण असल्यामुळे साहजिकच आई-वडिलांचे प्रोत्साहन होतेच. परंतु नियमित सराव आणि सहा तास अभ्यास करून एका ध्येयासाठी केलेली मेहनत फळास आली, याचा नक्कीच अभिमान आहे. त्यातही नाशिकचा लौकिक वाढवू शकलो यासारखा आनंद नाही. - सार्थक भट, नाशिक (राज्यात प्रथम) 

टॅग्स :examपरीक्षा