प्रश्न : मी असे ऐकले आहे की, एफ-१ विद्यार्थी व्हिसाला पात्र होण्यासाठी माझी आर्थिक पार्श्वभूमी भक्कम असणे गरजेचे आहे. व्हिसा मुलाखतीदरम्यान मी माझे आर्थिक नियोजन कसे दाखवू शकतो?
उत्तर : विद्यार्थी व्हिसासाठी अर्जदार पात्र ठरण्यासाठी काऊंन्सिल अधिकारी व्हिसा मुलाखती दरम्यान अनेक घटक विचारात घेतो. विद्यार्थ्यांची आर्थिक पार्श्वभूमी हा त्यापैकी एक महत्त्वाचा घटक आहे. ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये शिकायचे आहे, त्यांनी मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला त्यांच्या विद्यापीठाचे शुल्क आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा राहण्याचा खर्च याचे नियोजन कसे केले आहे, याची माहिती समजावून सांगणे गरजेचे आहे. कुटुंबाची बचत, कर्ज किंवा स्कॉलरशिप अशा विविध स्रोतांमधून अमेरिकेतील शिक्षणासाठी पैसे मिळू शकतात. मुलाखती दरम्यान अर्जदाराने कुटुंबाकडून पैसे मिळाले की शैक्षणिक कर्ज यासंदर्भात बोलणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप किंवा विद्यावेतन मिळाले असेल तर, जेव्हा अधिकारी त्यांना त्यांच्या आर्थिक नियोजनासंदर्भात विचारणा करेल, त्यावेळी त्याची माहिती देणे गरजेचे आहे. या माहितीमुळे तुमचे आर्थिक नियोजन कसे आहे, याची माहिती मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्याला मिळेल. सर्वांत महत्त्वाचे, मुलाखतीवेळी पहिल्या वर्षाचा सर्व खर्च कव्हर होईल, इतके पैसे विद्यार्थ्याकडे असायला हवेत. तसेच उर्वरित शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाचे ठोस नियोजन असायला हवे. जरी अर्जदाराच्या हातात आय-२० आणि SEVIS असले तरी मुलाखतीदरम्यान या कागदपत्रांपेक्षा मुलाखतीवरून तुमची पात्रता निश्चित करण्यासाठी अधिकारी जास्त भर देतात. तुमचा व्हिसा अर्ज बिनचूक असणे गरजेचे आहे. मुलाखतीदरम्यान सर्व संबंधित कागदपत्रे असायला हवीत. जरी अधिकाऱ्याने तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली नाही तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. विचारलेल्या प्रश्नांना थेट व खरी उत्तरे देण्यामुळे तुमचा अर्ज प्रोसेस करणे काउन्सिल अधिकाऱ्यासाठी सुलभ ठरते. विद्यार्थी व्हिसाच्या मुलाखती दरम्यान be yourself ! तुम्ही विद्यापीठाला अर्ज का केला आहे, तिथे मिळणारी पदवी तुमच्या करिअरशी कशी संबंधित आहे आणि तुमच्या शिक्षणाचा खर्च कसा करणार आहात, हे थेट व नीट समजावून सांगा. तुमची सत्यता अधिकाऱ्यांना जास्त भावेल. To learn about studying in the U.S., visit EducationUSA: https://educationusa.state.gov/. For more information about visas, visit https://www.ustraveldocs.com/.