शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

क्लिनिकल ट्रायलविषयी जागृती हवी

By admin | Published: May 20, 2016 1:54 AM

उस्मानाबादमधील २ वर्षांच्या एका मुलाच्या हातावर, पायांवर, तसेच शरीराच्या काही अन्य भागांवर रक्त साकळून गाठ तयार होत होती

पुणे : उस्मानाबादमधील २ वर्षांच्या एका मुलाच्या हातावर, पायांवर, तसेच शरीराच्या काही अन्य भागांवर रक्त साकळून गाठ तयार होत होती. ही गाठ उपचार केल्यानंतरदेखील वारंवार येत होती. अनेक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पालकांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठविण्यात आले. त्या वेळी त्याला रक्तस्रावाशी संबंधित हेमोफिलीया हा विकार झाल्याचे समजले. हेमोफेलीया या विकारावर उपचार करण्यासाठी लागणारी ही औषधे ही महाग असून सर्वसामान्य माणसांना ती न परवडणारी आहेत. परंतु हेमोफेलीयाग्रस्त मुलाच्या या पालकांना त्यांच्या २ वर्षाच्या मुलावर उपचार करणे शक्य झाले ते ते केवळ क्लिनिकल ट्रायलमुळे. स्वेच्छेने क्लिनिकल ट्रायलसाठी तयार झालेल्या रुग्णामुळेच वैद्यकीयशास्त्रात नवी औषधे व उपचारांच्या नव्या पद्धती व त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत.आपल्याला ताप आला, खोकला आला,सर्दी झाली की आपण लगेच डॉक्टरांकडून औषध घेतोव त्या औषधाच्या सेवनाने आपला आजार बरा होतो. आज असणाऱ्या जागतिक क्लिनिकल ट्रायल दिवसाच्या निमित्ताने क्लिनिकल ट्रायल्सचे विविध औषधांच्या तसेच वैद्यकीय उपचारांच्या विकासात असणारे महत्व व त्याद्वारे क्लिनिकल ट्रायल्सने मानवी जीवनामध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. २० मे रोजी जेम्स लींड या सर्जनच्या स्मृतीप्रीत्यर्थ जागतिक क्लिनिकल ट्रायल दिवस साजरा केला जातो. क्लिनिकल ट्रायल्स विषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. दीपा दिवेकर म्हणाल्या, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायल्स सुरु आहेत. परंतु, लोकसंखेच्या तुलनेत क्लिनिकल ट्रायल मध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या खुपच कमी आहे. क्लिनिकल ट्रायल विषयी जनजागृती खूपच कमी आहे व अनेकदा रुग्ण, मी जर अशा ट्रायल मध्ये सहभागी झालो तर माझ्या जीवाचे काही बरे वाईट होईल का? या भीतीपोटी क्लिनिकल ट्रायल मध्ये सहभागी होणे टाळतात. मात्र हे चुकीचे असून याविषयाबाबत जागृती होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ या संस्थेनुसार जगभरामध्ये १७ मे २०१६ पर्यंत क्लिनिकल ट्रायल्सच्या २,१५,७५२ केसेस नोंदवल्या आहेत.क्लिनिकल ट्रायल हे असे एक वैज्ञानिक संशोधन आहे की, ज्याद्वारे नव्याने तयार करण्यात आलेली औषधे त्यांच्या सेवनाची सुरक्षितता व त्यांची रोगांवर मात करण्याची कार्यक्षमता तपासली जाते. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये एखादा वैद्यकीय उपचार तसेच वैद्यकीय उपकरणे ही मानवी शरीराला उपयुक्त व सुरक्षित आहेत का? हे देखील तपासले जाते. क्लिनिकल ट्रायलच्या या प्रक्रियेमध्ये प्रोटोकॉलया दस्तऐवजाचा वापर करण्यात येतो. क्लिनिकल ट्रायलसाठी एख्याद्या रुग्णाने स्वेच्छेने त्या प्रकियेत सहभागी होणे आवश्यक असते. त्यातूनच भविष्यातील विविध रोगांवरील उच्च प्रतीची औषधे व वैद्यकीय उपचार, उपकरणे विकसित होऊ शकतात.