औरंगाबाद : समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (ए)चे राष्ट्रीयअध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.सुभेदारी गेस्ट हाउसमध्ये रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला आदरच आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल त्यांना आदर आहे की नाही, माहीत नाही, पण बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवून बाबासाहेबांच्या स्वप्नातले राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी ऐक्याच्या प्रक्रियेत यावे, त्यांचे नेतृत्व मानायला मी तयार आहे.आम्ही रा. स्व. संघासोबत नाहीत. आम्ही भाजपाबरोबर, नरेंद्र मोदींबरोबर आहोत. नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलले जाण्याची आम्हाला सुतराम शक्यता वाटत नाही. त्या केवळ वावड्या आहेत, असे आठवले म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये मुस्लीम आणि दलित काँग्रेसच्या बाजूने नाहीत. पाटीदार समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्य्२ाा आम्ही विरोधात आहोत.सुब्रमण्यम स्वामी व संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्याकडे आठवले यांचे लक्ष वेधले असता, मिश्कीलपणे ते म्हणाले की, राहुल गांधी हुशारच आहेत. हल्ली ते भाजपावर जोरदार टीका करीत असतात, पण राहुल गांधींपेक्षा उद्धव ठाकरे मला जास्त हुशार वाटतात.शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी दलित योजनांचे पाचशे कोटी रुपये महाराष्टÑ शासनाने वळविल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत, आठवले यांनी या संबंधीचा कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बसपा-रिपाइंच्या ऐक्याची गरज , मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 3:31 AM