शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रयत्नांची गरज : व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:21 AM

संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे.

वर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाची अडीच लाख नवी प्रकरणे समोर येतात. त्यातील ६० टक्के भारतातील असतात. भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. समाजात जागरुकता निर्माण करावी लागेल. कुष्ठरोगाच्या समूळ निर्मूलनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे व्यक्त केले.महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय येथे डॉ. एम.डी. गुप्ते व डॉ. अतुल शहा यांना कुष्ठरोग निर्मूलन कार्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल गांधी मेमोरिअल लेप्रसी फाउंडेशनचा आंतरराष्ट्रीय गांधी कुष्ठरोग सेवा पुरस्कार २०१७ नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती म्हणाले की, मानवसेवा हीच माधवसेवा अर्थात ईश्वरसेवा असल्याची गांधीजींची शिकवण होती. गांधीजींचे विचार आजही सुसंगत ठरतात. खादी स्वावंलबन व साधेपणाचे प्रतीक आहे, असे स्वदेशीबाबत शिकवण देताना गांधीजींनी सांगितले होते. त्यामुळे खादी उत्पादन मनरेगाशी जोडण्याची संकल्पना उपयुक्त ठरू शकते.१९५० मध्ये स्थापन गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशनने या रोगाच्या निर्मूलनासाठी चांगली कामगिरी करीत हा एक कलंक असल्याची समाजातील कल्पना दूर केली. या फाउंडेशनने कुष्ठरोग्यांवर उपचार केले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कामही केले. २०१२-१३ या काळात कुष्ठरोग्यांची संख्या ८३ हजार होती व त्यांचे प्रमाण १० हजार लोकसंख्येत ०.६८ टक्के होते. २०१२ पर्यंत देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ५४२ जिल्ह्यांतून या रोगाचा समूळ नायनाट करण्यात यश आले असले तरी नवी प्रकरणे पुढे येत आहे, याबाबत नायडू यांनी चिंता व्यक्त केली. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, खा.डॉ. विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष धिरू मेहता, जे. के. बांठिया, डॉ. बी.एस. गर्ग, पी.एल. तापडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.सेवाग्राम आश्रमाला भेट : नायडू यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधीजींच्या आश्रमाला भेट दिली. प्रथम त्यांनी आदी निवासाला भेट दिली. त्यानंतर बापू कुटी व आश्रमातील सर्व परिसराची पाहणी केली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी सुतमाळ व पुस्तक देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले. बापू कुटीमध्ये सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत व भजन झाले. त्यानंतर बापू कुटीसमोर वºहांड्यातील चरखाची माहिती त्यांनी जाणून घेतली. येथे काम करणा-या महिलांशी त्यांनी संवाद साधला. महादेव कुटीतील कापूस ते कापड हा आश्रमचा उपक्रम त्यांनी समजावून घेत पाहणी केली.मनरेगाद्वारे खादीला प्रोत्साहन देण्याची मागणीआश्रमचे मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी चरखा आणि विणाईला मनरेगात समाविष्ट केले तर ग्रामीण भागात रोजगाराची संधी निर्माण होईल आणि खादीला प्रोत्साहन मिळेल. यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी करीत निवेदन दिले. यावर उपराष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद देत पंतप्रधानांना शिफारस केली जाईल, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू