शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

दलित चळवळींना योग्य दिशा देण्याची गरज

By admin | Published: January 05, 2015 4:34 AM

शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़

भारत दाढेल, नांदेडशोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी दलित चळवळी योग्य दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे़ दलिताची व्याख्या एका जातीपुरती मर्यादित नाही़ सर्व घटकांना सोबत घेऊन जावे लागेल, त्यातच मानवतेची कल्पना आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ़ माधव गादेकर यांनी रविवारी केले़ ३२व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी दलितांच्या सांस्कृतिक व राजकीय चळवळी दिशाहीन झाल्या आहेत, या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी डॉ़ कृष्णा किरवले होते़ डॉ़ मा़ प़ थोरात, डॉ़ के़ के़ अहिरे, प्रा़ सुधीर अनवले, डॉ़ माधव गादेकर, अमर हबीब, डॉ़ गोपाल उपाध्ये, प्रा़ रामनाथ चव्हाण यांनी सहभाग घेतला़डॉ़ गादेकर म्हणाले, की डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आदर्श दिले आहेत, ते चळवळीत दिसत नाहीत़ १९६० नंतरच्या दलित चळवळी मानवतेचा संदेश देण्यासाठी रूढ झाल्या होत्या़ मात्र आता या चळवळीचे रूप हिडीस दिसत आहे़ ज्या चळवळीतून प्रबोधन होणे गरजेचे होते, ते होताना दिसून येत नाही़ डॉ़ बाबासाहेबांनी जी चळवळ उभी केली होती, ती आता दिसत नाही़ जयंतीच्या माध्यमातून पूर्वी व्याख्यानाचे, शाहिरीचे कार्यक्रम होत असत़ आता ते ऐकण्याची मानसिकता राहिली नाही़ ते समजून सांगितले पाहिजे़ डॉ़ रामनाथ चव्हाण म्हणाले, दलित म्हणजे बौद्ध का? दलित शब्दाच्या व्याख्येत आणखी कोण कोण आहेत? बौद्धेतर जे दलित आहेत ते हिंदू म्हणून जगत आहेत़ त्यांच्या चळवळीविषयी आपण का बोलत नाही़ त्यांची चळवळ कुठे आहे, या प्रश्नांचा शोध घेतला पाहिजे़ डॉ़ के़ के़ अहिरे यांनी दलित संस्कृती खऱ्या अर्थाने बौद्ध संस्कृती असल्याचे सांगितले़ डॉ़ मा़ प़ थोरात म्हणाले, जोपर्यंत आपण ब्राह्मणी संस्कृती सोडणार नाही तोपर्यंत आपण मानवतावादी संस्कृती रुजवू शकणार नाही़ अध्यक्षीय समारोपात कृष्णा किरवले म्हणाले, मानवी जीवनाला आकार देणारी सर्वमान्य झालेली विचारसरणी म्हणजे संस्कृती़ तेव्हा आपले चांगले काय आहे, हे सांगण्यासाठी वेळ खर्च करावा़ ब्राह्मणांवर टीका, टिंगलटवाळी करण्याऐवजी आपल्या चांगल्या गोष्टींचा प्रसार करावा़, असेही त्यांनी आवर्जून सांगितले़ (प्रतिनिधी)