ठाणे : गेली अनेक वर्षे शिवसेनेची ठाण्यात सत्ता आहे. त्यांनी विकासाकडे लक्ष कमी देऊन भ्रष्टाचार कसा करता येईल तसेच पैसे कसे काढता येतील, या दृष्टीने सत्ता चालवली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. ठाण्यात भ्रष्टाचाराची लागलेली कीड कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी आम्ही लढत असून भाजपाला हद्दपार करण्यासाठी आघाडी आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी संजय चौपाने, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश सचिव बाळाकृष्ण पूर्णेकर, शहराध्यक्ष मनोज शिंदे आदी उपस्थित होते. तसेच कॅलेंडरवरील छायाचित्र आणि घालत असलेले ११ लाखांचे सूट यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.विकासाबरोबर सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, क्लस्टर, पाणी आणि वाहतूककोंडी हे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट करताना राणे यांनी राष्ट्रवादीने आघाडी केल्यास एकत्र येऊ. मात्र, काँग्रेस ही निवडणूक जिद्दीने लढेल. अशा प्रकारची तयारी आम्ही केली आहे. ठाण्यातील सत्तारूढ शिवसेनेने अनेक बाबतीत, अनेक टेंडर, प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला. विकास, नागरी सुविधा, स्वच्छ ठाणे-सुंदर ठाणे, निरोगी बनवण्यासाठी गेल्या २५ वर्षांत शिवसेना कमी पडल्याचे त्यांनी सांगितले. त्यातच, निवडणुकीच्या तोंडावर झोपडपट्टी तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. ते पाहता त्या नागरिकांचे प्रथम पुनर्वसन केले पाहिजे, असे ते म्हणाले.विकास आणि नागरी सुविधांबरोबर जनतेला सध्या भेडसावणारा प्रश्न हा केंद्रात आणि राज्यात आलेली शिवसेना आणि बीजेपीची सत्ता, नोटाबंदी हा आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन विस्कळीत झाले आहे. जनता असहाय्य झाली आहे. हातावर पोट असलेल्या लोकांना रोजगार मिळत नाही. यामुळे ४५ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. हा विषय लोकांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) म्हणून आणली नोटाबंदी- काळा पैसा आणण्यात, भ्रष्टाचार आणि अतिरेकी कारवाया रोखण्यात बीजेपी कमी पडली. अच्छे दिन आणि महागाई, या विषयांना बगल देण्यासाठी नोटाबंदी आणली. त्यामुळे जनता नाराज आहेत. तसेच जर काँग्रेसमुक्तची घोषणा ते करीत असतील, तर भाजपामुक्तीच नाही राज्यातून त्यांना हद्दपार करणार असल्याची घोषणा राणे यांनी यावेळी केली. देशातून, राज्यातून भाजपा हद्दपार करण्यासाठी आघाडी आवश्यक असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.पारदर्शकतेसाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाराचा वापर करावामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती पारदर्शकतेवर हवी आहे. पण, शिवसेनेची पारदर्शकता काय आहे, याची विचारणा त्यांनी आधी आमदार आशीष शेलारांकडे करावी. केवळ, एसआयटी नेमण्याची भाषा करण्यापेक्षा आपल्या अधिकारांचा वापर करावा, असा टोला राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. काँग्रेसमध्ये मतभेद नाहीतकाँग्रेसमध्ये मतभेद नाहीत. गटातटांचा प्रश्न काँग्रेसमध्ये नाही तर सर्वच पक्षांमध्ये आहे. गटांचे राजकारण चालू देणार नाही. त्यांना खड्यासारखे बाजूला काढले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आघाडीची मानसिकता ठाण्यात आघाडीबाबत मानसिकता असून त्यादृष्टीने प्रयत्नशील आहोत. कळवा-मुंब्य्रातील मैत्रीपूर्ण लढतीबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यादृष्टीने चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या हद्दपारीसाठी आघाडी आवश्यक
By admin | Published: January 15, 2017 1:49 AM