मुंबई : जागतिक स्तरावरील दर्जाच्या स्पर्धेत उतरायचे असेल, तर मुंबईसह देशातील विद्यापीठांना अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही विभागांत क्रांतीची गरज असल्याचे मत प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. बाळकृष्ण पिसुपती यांनी व्यक्त केले. मुंबई विद्यापाठीच्या सर कावसजी जहांगीर सभागृहात पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते.पिसुपती म्हणाले की, ‘रोजच्या शैक्षणिक विश्वापार काही गोष्टी वाचून समजून घेण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त करायला हवे. आधुनिक शिक्षणासमोरील हे मोठे आव्हान आहे. फक्त पाठ्यक्रमावर आधारित शिक्षण न देता, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार असणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नवे संशोधन प्रकल्प देऊन साधणार नाही, तर विद्यार्थी आणि शिक्षकांनाही प्रशिक्षण आणि नवे वळण द्यावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी आवडेल तेच करता येईल, असे मार्ग शोधायला हवेत. तसे करताना जोखीम स्वीकारण्याची तयारीही ठेवावी लागेल. फक्त हे सर्व करताना निष्ठेला कधीही वेठीस धरू नका. कारण निष्ठा ही यशाचा पाया आहे,’ असे पिसुपती या वेळेस म्हणाले. या वेळी राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव हे अध्यक्षस्थानी होते, तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या उपस्थित दीक्षांत समारंभ पार पडला. गेल्या पाच वर्षांत विथ्द्यापीठात १०७ टक्क्यांनी पदवी आणि ११८ टक्क्यांनी पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, तर दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत १६२ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये १७१ टक्क्यांनी संशोधन पेपर्समध्ये वाढ झाल्याचे प्रशासनाने सांगितले. गेल्या पाच वर्षांत १८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने येथील प्राध्यापकांचा गौरव केल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.डिजिटल विद्यापीठ!नजीकच्या काळात मुंबई विद्यापीठात अनेक आॅनलाइन अभ्यासक्रम राबविले जाणार असून, त्याचे नियोजन केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सहभागी होत, विद्यापीठाने अनेक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ज्यामध्ये डिजिटल विद्यापीठ, कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम, इन्क्लुझिव लीडरशीप असे महत्त्वाचे उपक्रम विद्यापीठ येत्या काळात राबविणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.एक लाखाहून अधिक पदव्या या वर्षीच्या दीक्षान्त सोहळ््यात पदवी आणि पदव्युत्तर मिळून १ लाख ४६ हजार २४८ पदव्या प्रदान करण्यात आल्या. ज्यामध्ये १ लाख २१ हजार ८२९ पदवी आणि २४,४१९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कलाशाखेच्या २५,३१०, विज्ञानच्या १७ हजार २०७, वाणिज्यमधील ६४,७३८, तंत्रज्ञान शाखेतील २१,३५८, व्यवस्थापनात १२,१७४ आणि विधी शाखेच्या ५,४६१ विद्यार्थ्यांना पदव्या बहाल करण्यात आल्या आहेत. २७१ पीएच. डी आणि ३६ एमफील पदवी बहाल करण्यात आल्या आहेत, तर ६१ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक, ३ कांस्य पदक, २ कुलपती पारितोषिक आणि १ कुलपती पदक बहाल केले आहे.
शिक्षणात क्रांती होण्याची गरज
By admin | Published: January 15, 2016 1:40 AM