विकास झाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात ‘टोळ’ चे संकट आले असले तरी महाराष्ट्रातील शेतजमीन टोळीला प्रजननासाठी पूरक नसल्याने महाराष्ट्रावरील हे संकट कायमचे नाही आणि लवकरच नाहीसे होईल, अशी माहिती दिल्लीच्या भारतीय कृषी अन्वेषण संस्थेतील कीडशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. गोविंद गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
डॉ. गुजर म्हणाले, महाराष्ट्रातील माती ही अधिक चिकट आहे. अलीकडच्या दिवसात ती कोरडी आणि उष्णही आहे. त्यामुळे टोळ अशा मातीत अंडी देऊ शकत नाही. अंडी दिली तरी त्यातून टोळीचे प्रजनन होणार नाही. टोळीचे सामान्य आयुष्यमान २ ते ३ महिने आहे, त्यामुळे महाराष्ट्रावरचे संकट कमी होईल. असे असले तरी आता टोळीने केलेला हल्लाबोल थांबविण्यासाठी शास्त्रोक्त प्रयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारत सरकारने किडांशी अनुमोदीत कीडनाशकांचा उपयोग करताना तत्परता आणि दक्षतेची आवश्यकता आहे.
महाराष्ट्रात टोळ थोपवून धरण्यासाठी गवत जाळणे, फटाके फोडणे असे प्रयोग केले जात आहेत. मात्र, ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. त्याचा टोळीवर विशेष परिणाम होणार नाही. त्यापेक्षा निंबोळीच्या अर्कच्या फवारणीचा अधिक चांगला परिणाम होतो. कोरोनानंतर ‘टोळ’चे संकट हे देशासाठी आव्हान ठरले आहे. टोळधाडीस रोखण्यासाठी सुदृढ संशोधनाची गरज आहे. टोळधाडीवरील नियंत्रण आणि व्यवस्थापनावर खंत व्यक्त करताना डॉ.गुजर म्हणाले, टोळीने पाकिस्तान-भारत सीमेवर धाड टाकून दीड महिना होत आहे. राजस्थानच नव्हे तर पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील पिके उद्ध्वस्त होत आहेत. महाराष्ट्रात मे महिन्याच्या शेवटच्या आठवाड्यात अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात टोळीने शेतीमालाचे नुकसान केले आहे. भारत सरकारच्या कृषी विभागाने पाकिस्तान-भारत सीमेवरील राज्यात दहा ‘टोळ सचेतना’केंद्रे उभारली आहेत.देशात कोठून आले टोळ?या टोळीचे प्रजनन आफ्रिकेच्या सोमालिया, इथोपिया, केनिया, दक्षिण सुदान, युगांडा, अरब प्रयाद्वीप, पेनिन्सुलाच्या यमन, ओमान आणि सौदी अरेबिया व दक्षिण पश्चिम आशियाच्या इराण आणि पाकिस्तानात जुलै ते आॅक्टोबर महिन्यात होते. भारतात ही टोळ आफ्रिका, अरब पेनिन्सुला आणि इराण, पाकिस्तानमार्गे आली आहे.100 हेक्टर परिसरात ८ कोटींपेक्षा अधिक टोळ असू शकतात व वाऱ्याच्या दिशेनुसार प्रत्येक दिवशी १५० कि.मी. उडू शकतात.2018 पासून अरबी समुद्रात येणाºया वादळाच्या (भारतीय निनो) प्रभावाने आफ्रिकेत पडणाºया पावसाने टोळ प्रजननासाठी उत्तम हवामान निर्माण झाले.हवामान बदलाचा हा परिणाम आहे. टोळ कोणत्याही पिकास नष्ट करते. संत्रा, पपई, आंबे, वांग्याची पाने खातात. टोळ लाखोंच्या संख्येने असल्याने पिकांचे खूप नुकसान होते. लगेच वाºयाच्या दिशेनुसार ते दुसरीकडील पिके शोधतात.