शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 2:55 PM

येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा.

ठळक मुद्देसरकारी मदत हा शेवटचा पर्यायकेंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूकदुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनसाखर कारखान्यांना कर्ज देऊ नका

पुणे : आर्थिक अडचणीतील बँका इतर सक्षम बँकांनी विलिनीकरण करुन घेतल्यास बँकिंग व्यवसाय सुरळीत होईल. अडचणीतील बँकेला सरकारने मदत करावी हा उपाय अगदी शेवटचा असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना बँकींग रत्न आणि सहकारी बँकींग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शीला काळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अ‍ॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

गडकरी म्हणाले, येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा. एखादी चूक झाल्यास नागरीक जाब विचारतील. सहकार क्षेत्राविषयी लोकांमध्ये विश्वास कसा निर्माण होईल हे पाहिले पाहीजे. आज एकही खाते अनुत्पादित (एनपीए) होणारच नाही, असे नाही. याचा अर्थ कोणा संचालकांनी चुकीचा व्यवहार करु नये. अशा संचालकांना शिक्षा व्हायलाच हवी. मात्र, सरसकट सर्व संचालकांना जबाबदार धरुन चालणार नाही. सहकारी बँकीग क्षेत्राने या पुढे व्यावसायिक दृष्टीकोन (प्रोफेशनल अ‍ॅप्रोच) ठेवून काम केले पाहीजे. ‘राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका या एकाच प्रकारचे काम करतात. मात्र, केंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूक दिली जाते. राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्यास सरकार त्यांना पॅकेज देते. सहकारी बँकांना मात्र, अडचणीच्या काळात वाऱ्यावर सोडले जाते. केंद्र सरकारने सहकारी बँकांना किमान बँक गॅरंटीचा अधिकार द्यावा अशी मागणी सहकार मंत्री देशमुख यांनी केली. तसेच, दुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.  --------------------साखर कारखान्यांना कर्ज देऊ नका : गडकरीपश्चिम महाराष्ट्रातील कारखाने ७५ टक्के, मराठवाडा ६० टक्के आणि विदर्भातील कारखाने २५ टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांसारखे आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना कृपया कर्ज वितरण करु नका. मात्र, त्यांना उसापासून थेट इथेनॉल प्रकल्प उभारायचा असेल तर कर्ज वितरण नक्की करा, असा व्यावसायिक सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सहकारी बँकांना दिला. 

टॅग्स :PuneपुणेNitin Gadkariनितीन गडकरीbankबँकSugar factoryसाखर कारखाने