शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

नीरा बाजारतळाच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्षच !

By admin | Published: May 21, 2016 1:18 AM

नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत.

नीरा : सर्वाधिक उत्पन्नाची ग्रामपंचायत असलेल्या नीरा शहरातील बाजारतळ परिसरात प्रामुख्याने शेतकरीवर्गासाठी मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. आठवडेबाजारच्या दिवशी बाजारतळाच्या असलेल्या क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्राचा स्थानिक धनदांडगे आणि परगावातील व्यापाऱ्यांना बेसुमार वापर करू दिला जात आहे. शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी बाजारतळ परिसरातील लोकवस्तीमधील अंतर्गत रस्त्यांचा आधार घ्यावा लागतो. बाजारतळ परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छतागृहाची आणि कचराकुंडीची ठोस मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी, व्यापारी नाराजी व्यक्त करत आहेत. नीरा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडेबाजारसाठी ग्रामपंचायतीच्या मालकीचे सुमारे २३ गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. आठवडेबाजारच्या करवसुलीपोटी नीरा ग्रामपंचायतीला ठेकेदाराच्या माध्यमातून वार्षिक २५ लाख रुपयांपेक्षा अधिक निव्वळ उत्पन्न मिळत आहे. वास्तविक, गुरुवार वगळता अन्य दिवशी या परिसरात प्रामुख्याने दररोज पहाटेपासून शेतमालाची ठोक विक्री सकाळपर्यंत होत असते. नीरा परिसरातील शिवतक्रार, पिंपरे खुर्द, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, पाडेगाव, निंबूत, गुळुंचे, कर्नलवाडी अशा विविध गावांतील शेतकरी नीरा शहरातील बाजारतळ परिसरातल्या मंडईमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणतात. या शेतमालाच्या खरेदीसाठी प्रामुख्याने निंबूत, जेजुरी, सासवड, लोणंद, सातारा, महाड अशा विविध भागांतील दलाल-व्यापारी रात्रीपासूनच गर्दी करतात.बाजारतळाकडे जाण्यासाठी काही अंतर्गत रस्ते असून त्यापैकी जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच मच्छी मार्केट वसलेले आहे. या मच्छी मार्केटपासून ग्रामपंचायतीला एका दमडादेखील उत्पन्न मिळत नाही. शेतमालाची भाजी मंडई आणि आठवडेबाजार भरत असलेल्या बाजारतळाच्या अपुऱ्या जागेतच ८ लाखांपेक्षा अधिक निधी खर्च करून अद्ययावत मटण-मच्छी मार्केट बांधण्याचा ग्रामपंचायतीने घाट घातला असल्याची माहिती समजते. सध्या मुख्य रस्त्यावरच मच्छी बाजार भरत असल्याने विक्रेते आणि ग्राहकांच्या गर्दी व उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर वाहतुकीची दररोज कोंडी होत असून, या भागातील नागरिकांना रहदारीची मोठी अडचण निर्माण होत आहे. (वार्ताहर)बाजारतळ परिसरात आठवडेबाजाराच्या दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कठड्यांवर बसून शेतमालाची विक्री करता यावी, यासाठी पणन मंडळाच्या सहकायार्ने २५ लाख रुपये खर्चून गेल्या वर्षी कठड्यांचा जीर्णोद्धार करण्यात आला. अंतर्गत रस्त्यांवर नव्याने फेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले, तर मध्यभागी भव्य मोठा पथदिवा बसवून प्रकाशाची चांगली सोय करण्यात आली. स्वच्छतागृह बांधण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने अर्धवट स्थितीत सोडले आहे. संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहाचे काम अपूर्ण अवस्थेत का ठेवले, याचा उलगडा मात्र होईना आणि ग्रामपंचायत प्रशासनदेखील त्याकडे लक्ष देईना. परिणामी, शेतकरी-व्यापारी या परिसरातील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगतच्या जागेचा लघवीसाठी राजरोस वापर करीत आहेत.