पुणे : काँग्रेस ही कन्फ्युजन पार्टी आहे. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना देश सोडून जाण्याची वेळ आली. मात्र पळालेल्या या सगळ्यांना आम्ही परत आणू आणि कायदेशीर अद्दल घडवू असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केला. जावडेकर म्हणाले, काँग्रेस बोलते एक आणि करते दुसरे असा अनुभव आहे. सध्या काँग्रेसमध्ये निराशा दिसत आहे. त्यांच्या कोणत्याही आरोपांचा भारतातील मतदारांवर काहीही एक परिणाम होणार नाही. त्यामुळे जनता काँग्रेसला सत्ता देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते पराभव समोर दिसत असल्यामुळे भूलथापा देत आहे. त्यामुळे बोलाची कढी बोलाचा भात अशी परिस्थिती आहे अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसवर वार केला.मुंबई हल्ल्यानंतर सेनेने काँग्रेस सरकारला दहशतवादी तळ उध्वस्त करण्याची परवानगी मागितली होती, पण त्यांनी ती दिली नाही. मोदी सरकारने मात्र ही परवानगी दिली. हा फरक आहे दोन्ही सरकारमधला. जावडेकर म्हणाले, कर्जमाफीचीही खोटी आश्वासने देत आहेत. मोदींची लोकप्रियता वाढते आहे हे लक्षात आल्यामुळे काँग्रेस खोटे आरोप करत आहे असेही ते म्हणाले.