पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा देशभरात रविवारी (दि. ६) होणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत ही परीक्षा होणार असून देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा सकाळी दहा वाजता सुरू होणार असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांना अनेक बंधने घालण्यात आली आहेत. पेन, घड्याळ, मोबाईल, इतर वस्तु परीक्षा केंद्रात नेण्यात मनाई आहे. तसेच कपड्यांबाबतही मंडळाने स्पष्ट सुचना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ७.३० ते ८.३० आणि ८.३० ते ९.३० अशा दोन टप्प्यांमध्ये परीक्षा केंद्रावर बोलावण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. वेळेत हजर न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.नीटसाठी देशभरातील १३६ शहरांत २ हजार २५५ केंद्र आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३४५ केंद्र महाराष्ट्रात असून या केंद्रांवर १ लाख ८३ हजार ९६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातूनच सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ----------
नीट परीक्षा रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:29 PM
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत नीट परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांना सकाळी साडे सात वाजल्यापासूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.
ठळक मुद्देनीटसाठी देशभरातील १३६ शहरांत २ हजार २५५ केंद्र देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी