शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

पोलिसांचे दुर्लक्ष; रिक्षांच्या मुजोरीत वाढ

By admin | Published: February 28, 2017 3:26 AM

एरव्ही आंदोलनाचे इशारे देणाऱ्या नेत्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी-मस्तवालपणात वाढ झाली आहे.

कल्याण : आधी भिवंडी, नंतर ठाणे आणि आता कल्याणला रिक्षाचालकाने बसचालकावर हात उगारल्याची घटना घडूनही हात बांधून बसलेले पोलीस, एरव्ही आंदोलनाचे इशारे देणाऱ्या नेत्यांनी घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी-मस्तवालपणात वाढ झाली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरातील सर्व स्टॅण्ड एकत्र करून कोणतीही रिक्षा प्रवासी सांगेल त्या ठिकाणी येण्याची सक्ती केल्याखेरीज हा प्रश्न सुटणार नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. रिक्षाचालकांवर कारवाई करताना जो पक्ष, जी राजकीय संघटना विरोध करेल, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल केले, तरच ही कारवाई सुरळीत पार पडेल. त्यासाठी इच्छाशक्ती हवी; पण हप्त्याने हात बांधलेले पोलीस, पालिका अधिकारी ती दाखवतील का, हाच खरा प्रश्न असल्याचे त्याचे म्हणणे आहे.शिवाय, केडीएमसीचे थांबे, एसटी स्टॅण्डमध्ये बस आतबाहेर पडण्याच्या परिसरात रिक्षांना मज्जाव करण्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यासाठी पालिका, पोलिसांनी लगेचच मोहीम उघडण्याची गरज आहे. पण, हात बांधलेले पोलीस आणि पालिकेचे अधिकारी याबाबत परस्परांकडे बोट दाखवत असल्याने रिक्षाचालकांचे फावते, असा प्रवाशांचा आरोप आहे. बेकायदा रिक्षाभाडे भरण्यावर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यातूनच असे प्रकार वारंवार घडत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही; तर बसचालकांपाठोपाठ अन्य वाहनचालकांनाही रिक्षाचालकांची शिकार व्हावे लागेल,अशी स्थिती आहे. कल्याण बस डेपो आणि रेल्वे स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर पोलिसांच्या आशीर्वादाने बेकायदा रिक्षा स्टॅण्ड तयार झाले आहे. वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांदेखत तेसुरू आहे. पोलीस नसल्यास रिक्षाचालक एकही वाहन धडपणे तेथून जाऊ देत नाहीत. स्कायवॉकच्या खाली तीनतीन रांगा करून रिक्षा उभ्या केल्या जातात. व्होडाफोन गॅलरीपर्यंत ही रांग असते. भिवंडी, मेट्रो मॉल, नेतिवली, चक्कीनाका येथे जाणारे प्रवासी येथून बेकायदा भरले जातात. त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत नाही. त्यांच्या वाकड्यातिकड्या रांगांनी रस्ता भरून जातो. गुरुदेव हॉटेलला वळसा घालून डेपोत प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ बसला वळण घेण्यासाठीही जागा नसते. रस्त्याच्या मध्येच रिक्षा उभी करून अथवा प्रवेशद्वाराजवळ उभी करून बेकायदा प्रवासी भरणारे रिक्षाचालक बसला रस्ताही देत नाहीत. प्रसंगी आक्रमक पवित्रा घेतात. त्यामुळेच वाद होतात. यापूर्वीही असेच प्रकार कल्याण बस डेपोत घडले आहेत. त्याच्या निषेधार्थ बसचालक-वाहक संघटनांनी कामबंद आंदोलनही केले आहे. त्यातून पुन्हा प्रवासीच वेठीला धरले जातात. (प्रतिनिधी) >भररस्त्यात बेकायदा स्टॅण्डकल्याण स्टेशन परिसरातील रेल्वे न्यायालय हलवण्यात आले. त्या जागी टॅक्सी स्टॅण्ड तयार करण्यात आले आहे. स्टेशन परिसरात उल्हासनगर कॅम्प नंबर १, २ आणि ३कडे जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्ड आहे. बिर्ला कॉलेज, शहाडसाठीही रांग आहे. लालचौकी, खडकपाडा परिसरात जाण्यासाठी रिक्षा स्टॅण्ड आहे. नेतिवलीच्या दिशेला जाणाऱ्यारस्त्यावर स्टॅण्ड आहे. तरीही, मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या करून प्रवासी घेतले जातात आणि पोलीस ते पाहत राहतात. भिवंडीकडे जाणाऱ्या रिक्षाचालकांनी तर त्यांच्या स्टॅण्डला पाकिस्तान रिक्षा स्टॅण्ड असे नाव दिले आहे. तशाच प्रकारे दीपक हॉटेलनजीक स्कायवॉकखाली बिर्ला कॉलेज, प्रेम आॅटो, शहाड या ठिकाणचे बेकायदा प्रवासी भरले जातात. ही सर्व ठिकाणे प्रवाशांसोबत पोलिसांनाही पाठ आहेत. पण, ते त्यावर कारवाई करत नाहीत. आयुक्त थंड पडले! : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकाचा परिसर मोकळा करून स्टेशनपर्यंत बस आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी स्टेशन परिसरातील बांधकामे तोडण्यात आली. त्यानंतर, आयुक्तांसह पालिका थंड पडली. त्याचाही हा परिणाम आहे. अधिकृत रिक्षा स्टॅण्ड उभारण्याचा अहवाल आरटीओने महापालिकेला सादर करून दीड वर्ष उलटून गेले, तरी त्यावर महापालिकेने निर्णय घेतलेला नाही. तो झाल्यास बेकायदा रिक्षा स्टॅण्ड संपुष्टात येण्यास मदत होईल. कारवाई होत नसल्याचा आरोपबेकायदा भाडे भरणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी करूनही पोलीस कारवाई करत नसल्याने संघटना हतबल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.>तातडीने करण्याचे उपायकल्याण, डोंबिवली स्टेशन परिसरातील ठिकठिकाणचे - वेगवेगळ्या संघटनांचे सर्व स्टॅण्ड बंद करून एकच स्टॅण्ड करणेप्रवासी बसल्यावर तो सांगेल तेथे रिक्षा नेण्याची सक्तीरेल्वे स्टेशनपर्यंत केडीएमटीच्या बस आणणेरिक्षाचालकांना गणवेश, बॅजची सक्तीरिक्षातून उजव्या बाजूला उतरण्यावर बंदीसाठी साखळी किंवा पट्टीशेअरच्या विविध टप्प्यांचे दरपत्रक सोशल मीडियावर उपलब्ध करून देणेसीएनजीच्या दरपत्रकाची तत्काळ अंमलबजावणी