शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

नाशिक महामॅरेथॉन : ‘इथोपिया’चा लेमलू इमाटा तर महिलांमध्ये नेहा सोनवणे विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:45 PM

गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात  लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

ठळक मुद्देनाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी तृतीय क्रमांक राखला. २१ किलोमीटरसाठी खुल्या पुरूष गटात पिंटू यादव हा द्वितीय तर रमेश गवळी तृतीय आला. ज्येष्ठांच्या गटात कैलास माने यांनी प्रथम तर लक्ष्मण यादव यांनी द्वितीय क्रमांक राखला

नाशिक : उगवत्या दिनकराच्या साक्षीने जल्लोषपूर्ण वातावरणात अन् ओसंडून वाहणाºया उत्साहामध्ये लोकमतच्या वतीने आयोजित नाशिक महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो नाशिककरांसह महाराष्टÑातील विविध शहरांमधून तसेच गुजरातच्या अहमदाबाद, सुरतसारख्या शहरांमधून व परदेशातूनही धावपटूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये दोन परदेशी धावपटू विजेते ठरले. २१ कि.मी.च्या पुरूष गटात  लेमलूू मिकीयस इमाटा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर ज्येष्ठांच्या महिला प्रवर्गात अर्जेंटिनाच्या लिना यांनी द्वितीय क्रमांक राखला.२१ किलोमीटरसाठी खुल्या पुरूष गटात पिंटू यादव हा द्वितीय तर रमेश गवळी तृतीय आला. महिलांमध्ये श्वेता भिडे यांनी द्वितीय आणि निता नारंग यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच ज्येष्ठांच्या गटात कैलास माने यांनी प्रथम तर लक्ष्मण यादव यांनी द्वितीय क्रमांक राखला आणि महिलांमध्ये केल्लम्मा अल्फोन्सो यांनी प्रथम तर शीतल संघाई यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आणि जयश्री पटेल यांनी तृतीय क्रमांक राखला. तसेच संरक्षण खात्यातील सेवानिवृत्त ज्येष्ठ गटात २१ किलोमीटरमध्ये दिलीप राठी प्रथम तर के.रामकृष्णन द्वितीय आणि नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी तृतीय क्रमांक राखला. महिलांमध्ये चंपाबेन व्यंकरिया प्रथम तर प्रितीका चौधरी या द्वितीय आल्या.

१० कि.मीमध्ये खुल्या पुरूष गटात अतुल चौधरी (प्रथम) तर महिला वर्गात पूजा शिरोडे यांनी बाजी मारली. तसेच १० कि.मीच्या गटात ज्येष्ठ प्रवर्गात पांडुरंग पाटील हे प्रथम तर विजय शिंपी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच जेष्ठ महिलांमध्ये शोभा देसाई प्रथम तर अर्जेंटिना लीना यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच पाच किलोमीटरच्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनाही पदक प्रदान करण्यात आले.

विजेत्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता ललीत प्रभाकर, यांच्यासह लोकमत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संयोजिका रुचिरा दर्डा, जीएम डायरेक्टर आशिष जैन, धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, संजिवनी जाधव, लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी.चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, दिपक बिल्डर्स अ‍ॅन्ड डेव्हलपर्सचे संचालक दिपक चंदे, ‘फ्रू टेक्स’चे नरेश गुप्ता, शैलेश गुप्ता जहागिरदार बेकर्सचे मिलिंद जहागीरदार, सपकाळ नॉलेज हबचे रविंद्र सपकाळ, सुला विनियार्डचे निरज अग्रवाल, फ्रावशी इंटरनॅशनलचे रतन लथ, संदीप युनिव्हर्ससिटीचे कुलगुरू एस. रामचंद्रन, संदीप कुलकर्णी, एलआयसीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप शेणॉय, अपोलो हॉस्पिटलचे डॉ. अनुज तीवारी, सह्याद्री फूडचे क्षितिज अग्रवाल आदि मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक चांडक यांनी केले व आभार रुचिरा दर्डा यांनी मानले.