शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

नेपाळमध्ये भीषण अपघात झालेल्या बसमधील भाविक महाराष्ट्रातील, आतापर्यंत १४ मृतदेह सापडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 3:21 PM

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, बसमधून प्रवास करत असलेले भाविक हे महाराष्ट्रातील (Maharashtra) असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून, आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, बसमधून प्रवास करत असलेले भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सुमारे ४० भाविकांना घेऊन पोखरा येथून काठमांडूला जात असताना या बसला अपघात झाला आणि ती नदीत कोसळली.

याबाबत मिळत असलेल्या महाराष्ट्रातील एकूण ११० भाविक हे नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. प्रयागराज येथून तीन बसमधून हे प्रवासी नेपाळमध्ये गेले होते. हे प्रवासी भुसावळ आणि आसपासच्या भागाती असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान. या तीन बसपैकी एक बस घसरून अपघातग्रस्त झााली आणि पृथ्वीराज मार्गावरील दमौली मुगलिंग रोड खंड मार्स्यांगदी नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. तसेच अपघातग्रस्त बसमधील काही प्रवासी हे वाहून गेले असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. 

याबाबत राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की, साधारणत: तासाभरापूर्वीच मला या अपघाताबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आणि मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी नेपाळच्या दुतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबरोबरच उत्तर प्रदेशच्या रिलिफ कमिश्नरशी संपर्क करून नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालेल्या बसमधील भाविकांच्या आणि इतर पर्यटकांच्या मदतीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  

याबाबत नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचा क्रमांक UP FT 7623 हा आहे. ही बस नेपाळमधील पोखरा येथून काठमांडूला जात असताना नदीत पडला. सकाळी 11.30 च्या सुमारास हा अपघात झाला. तेथून जाणाऱ्या लोकांनी बस नदीत कोसळल्याचे पाहिले आणि पोलिसांना कळवले. ही बस उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील धरमशाला मार्केटमधील सौरभ केसरवानी यांच्या पत्नी शालिनी केसरवानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNepalनेपाळIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रJalgaonजळगाव