कडक नियमांचा परीक्षार्थ्यांना फटका : महिलांना काढावे लागले मंगळसूत्र, चिमुकल्यांची झाली फरफटनागपूर : 'सीबीएसई'तर्फे रविवारी घेण्यात आलेल्या ह्यनेटह्णच्या (नॅशनल एलिजिबिलीटी टेस्ट) कडक नियमांचा परीक्षार्थ्यांना फटका बसला. अनेक परीक्षा केंद्रांवर नियमांच्या नावाखाली महिला उमेदवारांना अंगावरील दागिन्यांसोबतच चक्क मंगळसूत्रदेखील काही काढावे लागल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी केला आहे. काही परीक्षा केंद्रांना बाहेरुन टाळे लावल्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या महिला परीक्षार्थ्यांसोबत आलेल्या त्यांच्या चिमुकल्यांची फरफट झाली. सुरक्षा तपासणीनंतर अनेक परीक्षार्थी एकाग्रतेने पेपरच सोडवू शकले नसल्याचे परीक्षार्थ्यांना सांगितले.राज्यात ह्यनेटह्णसाठी ८ शहरांतच परीक्षा केंद्र होते. त्यात विदर्भातून केवळ नागपूर व अमरावतीचा समावेश होता. त्यामुळे बाहेरगावाहून अनेक उमेदवार पेपर देण्यासाठी नागपूरला आले होते. प्रत्यक्षात पेपर ९.३० वाजतापासून असतानादेखील ह्यसीबीएसईह्णने ७ वाजताच परीक्षार्थ्यांना येण्याच्या सूचना दिल्या होत्या. परीक्षा केंद्रावर गेल्यावर अनेक परीक्षार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. परीक्षेच्या दरम्यान पेपरफूट व कॉपीसारखे प्रकार टाळण्यासाठी मोबाईल, घड्याळ यासारख्या वस्तू नेण्याची परवानगी अगोदरच नाकारण्यात आली होती. परंतु काही ठिकाणी नियमांचे कारण देऊन ऐन वेळी पुरुषांना पॅन्टचे बेल्ट काढण्यास सांगण्यात आले. काही ठिकाणी बुटांवरदेखील आक्षेप घेण्यात आला. काही परीक्षाकेंद्रांवर तर महिलांना दागिने घालण्याची परवानगीदेखील नाकारण्यात आली, असा आरोप परीक्षार्थ्यांकडून करण्यात आला आहे. याबाबत परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी नियमांचा हवाला दिला. १२.३० वाजता संपलेल्या पेपरनंतर पुढील पेपरसाठी दीड तासांचा अवधी होता. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजाने अनेकांना भूक मारावी लागली
'नेट' झाली नाही नीट
By admin | Published: July 10, 2016 9:17 PM