शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

नेट-सेटधारक दिल्लीत धडकणार

By admin | Published: May 17, 2016 5:28 AM

नेट-सेटधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात १९ मे रोजी देशातील अनेक राज्यांतील नेट-सेटधारक जंतरमंतर दिल्ली येथे धडकणार आहेत

मुंबई : नेट-सेटधारकांच्या विविध मागण्यांसंदर्भात १९ मे रोजी देशातील अनेक राज्यांतील नेट-सेटधारक जंतरमंतर दिल्ली येथे धडकणार आहेत. ते तिथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करती. विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानवसंसाधन विकास मंत्रालयाचे नेट-सेटधारकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे. नेट-सेटच अनिवार्य असावे, नेटसेटधारकांना पीएच.डी.प्रमाणे वेतनवाढी आणि इतर लाभ मिळावेत, सहप्राध्यापकांची नियुक्ती केंद्रीय पद्धतीने व्हावी, २००५ पूर्वीची पेन्शन योजना लागू करावी, नेटसेटधारकांची सेवा नेट-सेट उत्तीर्ण तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावी या नेट-सेटधारकांच्या प्रमुख मागण्या आहेत. त्याचबरोबर बेरोजगार नेटसेटधारकांना २५ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, एपीआय रद्द करून प्राध्यापकांची वेतन निश्चिती संस्था आणि महाविद्यालयाच्या रँकिंगनुसार करण्याचा विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाने घातलेला घाट रद्द करावा, अशीही मागणी या वेळी करण्यात येणार आहे. या मागण्यांसाठी क्वालिटी एज्युकेशन फोरम, इंडियन नेट-सेट असोसिएशन (इन्सा), सोसायटी फॉर क्वालिटी एज्युकेशन आणि अन्य संघटना लाक्षणिक उपोषण करणार आहेत. (प्रतिनिधी)