शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

नेटबॉलपटू मयूरेशचा समुद्रात बुडून मृत्यू

By admin | Published: February 03, 2015 2:28 AM

येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला.

धक्का : साताऱ्याला आणणार मृतदेहथिरुअनंतपूरम : येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला. २० वर्षांचा मयूरेश सोमवारी येथील षणमुगम बीचवर संघासह फोटो काढण्यासाठी गेला होतावेल्लायानी येथे असलेल्या इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारी सकाळी महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा सामना चंदिगडविरुद्ध होता. या लढतीत महाराष्ट्राचा संघ ०-५ गुणांनी पराभूत झाला. सामना संपल्यानंतर संघाचे खेळाडू तेथे असलेल्या बीचवर फोटो काढण्यासाठी गेले होते. तेथे मयूरेश समुद्रात बुडाला. त्याला लगेच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलकडे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मयूरेशचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. तिथून ते मायणीत नेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.मयूरेश सलग आठ-नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. त्याचे वडील मायणी अर्बन बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. धाकटा भाऊ आकाश याचे विटा (ता. खानापूर) येथे डिप्लोमाचे शिक्षण सुरूआहे.या प्रकारामुळे संघातील सर्व खेळाडू व अधिकाऱ्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. नेटबॉल संघाचे खेळाडू तर अजूनही स्वत:ला सावरू शकले नाहीत. - अ‍ॅड. धनंजय भोसले, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख