तक्रार करुनही कारवाईस विलंबअंबरनाथ : अंबरनाथ शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांना पालिकेतील अधिकारीच जबाबदार असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शहरात अनधिकृत बांधकाम सुरु असल्याची तक्रार एका नागरिकाने केलेली असतांनाही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील दुबई कॉलनी परिसरात राहणारे प्रशांत भावसार यांचे वडिलोपार्जीत घर आहे. या घराला लागूनच अनधिकृत बांधकाम सुरु आहे. या बांधकामाचा काही भाग हा भावसार यांच्या जागेत येत आहे. या संदर्भात त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. २३ सप्टेंबर २०१३ रोजी केलेल्या अर्जाची दखल न घेतल्याने पुन्हा १८ फेब्रुवारी २०१४ रोजी अर्ज केला. या दोन्ही अर्जांची दखल न घेतल्याने पुन्हा २५ एप्रिल आणि ०३ मे रोजी अर्ज केला. या सर्व अर्जांकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर भावसार यांनी पालिका मुख्याधिकारी निधी चौधरी यांनी भेट घेतली. तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी कारवाई टाळण्यासाठी कोणत्या प्रकारे कारणे देतात याची माहिती दिली. भावसार यांच्या अर्जावर कारवाई करण्याचे आश्वासन चौधरी यांनी दिले आहे.
अनधिकृत बांधकामांकडे पालिका अधिका-यांचे दुर्लक्ष
By admin | Published: May 10, 2014 8:22 PM