कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 04:42 PM2023-08-16T16:42:06+5:302023-08-16T16:42:42+5:30

मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असा टोलाही शरद पवारांनी भाजपाला लगावला.

Never brings politics into the family; Sharad Pawar's re-explanation on Ajit Pawar's meeting | कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण

कुटुंबात कधीही राजकारण आणत नाही; अजित पवार भेटीवर शरद पवारांचं पुन्हा स्पष्टीकरण

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर – अजित पवारांशी झालेली भेट ही गुप्त भेट नव्हती. त्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत माझ्याशिवाय काँग्रेस-ठाकरे गटाचा प्लॅन ही केवळ चर्चा आहे. प्रत्यक्ष अशी वस्तूस्थिती नाही. असत्यावर आधारीत ती चर्चा आहे. संजय राऊतांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. देशाची सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात आहे. त्यांची भूमिका समाजात एकता टिकवून ठेवण्याची आहे, पण ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत. मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात २ सभा घेणार आहे. बिहार आणि कर्नाटकात मी सभा घेईन असं त्यांनी सांगितले.

तसेच सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसं सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असा टोलाही शरद पवारांनी भाजपाला लगावला.

दरम्यान, गेल्या ८-१० दिवसांपासून मी महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहे. २ दिवसांपूर्वी सोलापूरच्या सांगोला परिसरात किमान १००० जणांनी माझी गाडी वेगवेगळ्या ठिकाणी अडवली. पुणे, सातारा आदी ठिकाणचे अनेक कार्यकर्ते मला भेटायला आले. मी उद्या बीडच्या दौऱ्यावर आहे. मी जिल्ह्यात जावो ना जावो लोकं मला साथ देतात हा माझा अनुभव आहे. आम्ही मविआ म्हणून एकत्रित लोकांसमोर जाणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुणांनी कोणत्या रस्त्याने जायचे ते ठरवले आहे. त्याचा निकाल २०२४ च्या निवडणुकीत दिसेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

कुटुंबात मी कधीही राजकारण आणत नाही

कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी घरात राजकारण आणत नाही. प्रा. एन. डी पाटील चळवळीतील नेते होते. एकेकाळी मंत्री होते. त्यांची बायको ही माझी सख्खी बहीण आहे. आम्ही सभागृहात एकमेकांविरोधात होतो. पण घरात कौटुंबिक कार्य असेल तर आम्ही घरी जायचो. माझ्या बहिणीचे पती विरोधी पक्षातील, आम्ही नातं तोडलं का? उद्या अजित पवारांच्या घरात २ मुले आहेत. त्यांच्या लग्नाचं काही ठरलं तर मला विचारणा होणारच ना. आम्ही भाजपाविरोधात आहोत. भाजपासोबत जे असतील त्यांचा आमचा संबंध नाही. आम्ही भाजपासोबत कधी जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे असंही शरद पवारांनी स्पष्ट केले.

आम्ही इंडियाची स्थापना सगळ्यांनी मिळून केली, आम्हाला देशात बदल हवा. २०२४ ला देशाचे आणि राज्याचे चित्र बदलले पाहिजे. त्यासाठी जे असेल त्यावर आम्ही चर्चा करू. कार्यकर्त्यांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. नाशिक, सांगोला, सोलापूर कुठेही कार्यकर्त्यांना विचारा. निवडणूक आयोगाने जी नोटीस पाठवली त्याचे उत्तर आम्ही दिलेले आहे. सविस्तरपणे उत्तर दिले आहे असंही पवारांनी सांगितले.

 

Web Title: Never brings politics into the family; Sharad Pawar's re-explanation on Ajit Pawar's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.