शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

ई-टेंडरवरून आता नवा गोंधळ

By admin | Published: July 07, 2016 12:54 AM

ई-टेंडर न काढताच आदिवासी विभागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी चिक्कीचे कंत्राट दिल्याने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे सरकारला टीकेला सामोरे

मुंबई : ई-टेंडर न काढताच आदिवासी विभागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी चिक्कीचे कंत्राट दिल्याने महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागले. तसेच उच्च न्यायालयालाही उत्तर द्यावे लागले. पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांचे खातेही कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. रेनकोट खरेदीसंदर्भात काढलेले ई-टेंडर ऐनवेळी का रद्द केले? आम्हाला याचे स्पष्टीकरण द्या. समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे.बेकायदेशीर व मनमानीपणे वागल्याबद्दल आणि उच्च न्यायालयाने रेनकोट खरेदीला स्थगिती देऊनही खरेदीचे आदेश देऊन उच्च न्यायालयाचा आदेश गृहीत धरल्याबद्दल आम्ही कोणावर कारवाई करायची? मंत्री की सचिव, हेही स्पष्ट करा, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारी वकील पी. ए. काकडे यांच्याकडे केली.उच्च न्यायालयाने रेनकोट खरेदीसंदर्भातील सर्व कागदपत्रेही सील करत सरकारी अधिकारी फसवणूक करत असल्याचे निरीक्षणही नोंदवले. राज्यामधील एकूण ३२२ आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदीकरिता सरकारने ई-टेंडर काढले. निविदा खुल्या करण्याच्या काही दिवस आधी सरकारने ही प्रक्रिया रद्द केली. पावसाळा सुरू झाल्याने निविदा प्रक्रियेत अडकल्यास विद्यार्थ्यांना वेळेवर रेनकोट मिळणार नाही, असे सांगून सरकारने निविदा प्रक्रिया रद्द केली आणि ठाणे, जव्हार आणि नाशिक विभागातील आश्रमशाळांतील मुख्याध्यापकांना तीन लाखपर्यंत रेनकोट खरेदीचे अधिकार दिले. सरकारच्या या निर्णयाला सुपर पॉलीमर्स या कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ‘१६ सप्टेंबर २०१३ च्या अधिसूचनेनुसार, मुख्याध्यापकांना ५० हजारांपर्यंत वित्तीय मर्यादा घालण्यात आली आहे. आदिवासी विभाग सचिवांनी मुख्याध्यापकांना तीन लाखांपर्यंत रेनकोट खरेदी करण्याचे अधिकार देऊन २०१३ च्या अधिसूचनेचे उल्लंघन केले आहे. अशा प्रकारे खरेदीचे आदेश देऊन सरकार भ्रष्टाचारास खतपाणी घालत आहे. निविदा प्रक्रिया वगळण्यासाठी सरकार अशा प्रकारे छोट्या स्वरूपात खरेदीचे आदेश देत आहे,’ असा युक्तिवाद याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. एस.एम. गोरवाडकर आणि अ‍ॅड. तुषार सोनावणे यांनी केला. उच्च न्यायालयाने रेनकोट खरेदीवर स्थगिती दिली. या स्थगितीनंतर राज्य सरकारने धूर्तपणे राज्यातील उर्वरित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना रेनकोट खरेदीचे आदेश दिले. आदेशासंबंधी केलेल्या पत्रव्यवहारावर उच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीची तारीख नमूद केली. मात्र सरकारची ही चलाखी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणली. त्यामुळे न्यायालयाने सरकारची कागदपत्रे सील केली. (प्रतिनिधी) ओव्हरस्मार्ट होऊ नका‘सरकारी अधिकारी फसवणूक करत आहेत. आम्ही रेनकोट खरेदीला स्थगिती देऊनही रेनकोट खरेदीचे आदेश दिलेत. ‘ओव्हरस्मार्ट’ बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही उच्च न्यायालयाचा आदेश गृहीत धरलात,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरत आदिवासी विकास विभागाच्या सचिवांना ऐनवेळी ई-टेंडर रद्द का केले, याचे स्पष्टीकरण आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले. योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास कठोर कारवाई करू, असा इशाराही उच्च न्यायालयाने दिला.