सातारा : ‘रोजच्या अंकातून निर्भिड पत्रकारिता करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’मधूनही शोधपत्रकारितेचा नवा आदर्श निर्माण केला आहे,’ अशा शब्दात जिल्ह्यातील मान्यवर नेतेमंडळींनी ‘दीपोत्सव’चे जोरदार स्वागत केले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते या अंकाचे शानदार स्वागत करण्यात आले.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील पत्रकारांसमोर या ‘दीपोत्सव’चे प्रकाशन केले. यावेळी बोलताना रामराजे म्हणाले, की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’चेही स्वतंत्र अस्तित्व मोठ्या दिमाखात सिद्ध केले आहे. यापुढेही ‘लोकमत’ची घोडदौड अशीच राहो.’ कोरेगाव तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी या अंकाचे स्वागत केले. प्रकाशन झाल्यानंतर शिंदे म्हणाले, ‘वाचनाची सवय कमी होत असताना तरुण वर्गालाही ‘लोकमत’ने वाचनसंस्कृतीशी जुळवून ठेवले आहे. मी दरवर्षी मोठ्या आवडीने ‘दीपोत्सव’ वाचतो. जपून ठेवतो. ‘लोकमत’चा ‘दीपोत्सव’ तरुणांना भेट देण्यायोग्य असतात. शोधपत्रकारितेचे वारसा ‘लोकमत’ने यापुढेही असाच सुरू ठेवावा.’माण-खटाव तालुक्यांत ‘दीपोत्सव’चे स्वागत करताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, ‘दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘लोकमत’ने देशाबाहेरही जाऊन कुंपणात अडकलेल्या सिरियावासीयांच्या कथा दीपोत्सवमधून सादर केल्या आहेत. ‘लोकमत’चा दीपोत्सव वरचेवर वाचनीय व दर्जेदार बनत चालला आहे.’वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यांत या ‘दीपोत्सव’चे स्वागत करताना आमदार मकरंद पाटील म्हणले की, ‘लोकमत’ची पत्रकारिता नेहमीच पवित्र अन् आदर्श राहिली आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोकप्रतिनिधींची सकारात्मक बाजू मांडणाऱ्या ‘लोकमत’ने वेळप्रसंगी जनतेसाठी कठोरपणे आसूडही ओढला आहे. ‘दीपोत्सव’मधूनही वास्तववादी पत्रकारितेचा नवा इतिहास घडला आहे. याचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.’कऱ्हाडमध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते दीपोत्सवचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले की, ‘कथा, कादंबरी आणि कविता या नेहमीच्या सरळसोट साहित्याला छेद देत ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव’ने वास्तववादी पत्रकारितेची नवी वाट चोखाळली आहे. सतत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या ‘लोकमत’ने ‘दीपोत्सव’च्या माध्यमातूनही आपली वेगळी छाप संपूर्ण महाराष्ट्रभर उमटवली आहे. यामुळे वाचकांना नवीन वाचन्याची सवय लागणार आहे.’ (प्रतिनिधी)साताऱ्याच्या लेखणीचाही सर्वत्र गौरवहरियाणा येथील महावीरसिंग फोगट यांच्या मुली आॅलिम्पिक व आशियाई स्पर्धेत कुस्तीचे मैदान मारून येतात. या घटनेवर आमिर खान ‘दंगल’ नावाचा चित्रपट काढतोय, यावर प्रकाशझोत टाकणारी स्टोरी साताऱ्याच्या लेखणीने तयार केली आहे. राज्याबाहेर जाऊन एखाद्या वेगळ्या बातमीचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या साताऱ्याच्या लेखणीचाही जिल्ह्यात ठिकठिकाणी कौतुक करण्यात आले.
‘दीपोत्सव’मध्ये शोधपत्रकारितेचा नवा आयाम
By admin | Published: November 08, 2015 8:44 PM