- शुभा प्रभू साटमग्रामीण भागातील मुली-तरुणींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.पोलीस, लष्कर अशा ठिकाणी नोकरीचा प्रयत्न करणा-या व प्रसंगी त्यासाठी सुरक्षित कवच सोडून शहरात किंवा तालुका, जिल्हा ठिकाणी राहणाºया ग्रामीण मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. पोरगी न्हातीधुती झाली की, तिला उजवून टाकणे हा एकमेव अजेंडा असण्याच्या विचारधारेपासून येथपर्यंत झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. नव्या वर्षाच्या कॅलेंडरमध्ये पाहिले जाते ते भविष्य... काय घडणार पुढील वर्षात?तर २०१८ हे वर्ष कसे असेल? सर्वात महत्त्वाचे हे की, संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या हाडिया उर्फ अखिला हिच्या विवाहासंदर्भातला निर्णय या वर्षी सांगितला जाईल. आधीची हिंदू असलेल्या अखिलाचे मतपरिवर्तन करून, तिला जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला गेल्याचा दावा हाडियाच्या वडिलांनी दाखल केला आहे. अखिला हाडिया वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणारी कायद्याने सज्ञान असलेली सुशिक्षित मुलगी आहे. तिला विवाह, धर्म, शिक्षण यांची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारताची घटना देते, पण परंपरागत पुरुषी मनोवृत्ती आणि धर्म भावनेने आंधळे झालेल्यांना हे उमगणार नाही. तर हाडियाच्या विवाहाबद्दलचा निर्णयफे ब्रुवारीमध्ये सुनावण्यात येईल. या घटनेवरून एक लक्षात येते की, फक्त वर्ष बदलले... विचार नाहीत किंवा रूढी नाहीत... वरील घटना ही त्या दृष्टीने महत्त्वाची ठरावी.पुढील वर्षी #मीट किंवा #ेी ३ङ्मङ्म. ही चळवळ आणखी फोफावेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी होणाºया सुप्त लैंगिक छळाविरुद्धचा हा लढा खरे तर २००६ तच सुरू झाला. या वर्षाअखेरीस त्याला अधिक जागतिक रूप आले. मुख्य म्हणजे, भारतात अनेक जणी या हॅशटॅगमधून व्यक्त होऊ लागल्या. इथे अशा गुन्ह्याबाबतची बळी असूनही बाईला हेतुपुरस्सर दिली जाणारी अपराधीपणाची भावना किंवा याला तीच जबाबदार हे मानणे आता हळूहळू बंद होत आहे.वर्ष संपल्यावर उपक्रम संपले असे न होता, नव्या वर्षात हे उपक्रम अधिक जोराने बहुव्यापी होतील, हा विश्वास आहे. राइट टू पी ही चळवळ अधिक यशस्वी होईल. याचे श्रेय प्रामुख्याने सोशल मीडियालाच जाते हे निर्विवाद. अर्थात, वर उल्लेख केलेल्या दोन गोष्टी पूर्णपणे शहरी अथवा नागर विभागकेंद्री आहेत. थोडक्यात, आशेला जागा नक्कीच आहे. लिंगसापेक्ष समान हक्काच्या नव्या युगाकडे २०१८ हे वर्ष अधिक उमेदीने नेवो, ही इच्छा.(लेखिका स्त्रीमुक्ती चळवळीत कार्यरत आहेत.)
समान हक्काच्या नव्या युगाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 6:34 AM