शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

अजमेरा कॉलनीत पालिकेचे नवे नेत्र रुग्णालय

By admin | Published: August 04, 2016 1:28 AM

अजमेरा कॉलनी पिंपरी येथे रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नेत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

पिंपरी : अजमेरा कॉलनी पिंपरी येथे रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या जागेवर नेत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे. पाच कोटी रुपये खर्चून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यापूर्वी या ठिकाणी कर्करोग रुग्णालयाचा प्रस्ताव होता. परंतु, त्याऐवजी नेत्र रुग्णालयाचा प्रस्ताव पुढे आला असून, प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे हे पहिलेच नेत्र रुग्णालय आहे. एखाद्या आजारासाठी स्वतंत्र महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय अद्यापपर्यंत कोठेही उभारलेले नाही. अजमेरा कॉलनीत २० खाटांचे हे नेत्र रुग्णालय, तसेच ३० खाटा अर्बन हेल्थ सेंटरसाठी असे मिळून ५० खाटांचे हे रुग्णालय साकारले जात आहे. प्रकल्प उभारणीसाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. महिनाभरात स्थापत्य विभागाकडून इमारतीचे काम सुरू होईल, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. कर्करुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, महापालिकेकडून कॅन्सर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली झाल्या नाहीत. त्याबद्दल उदासीनता दाखवली गेली. मध्यंतरीच्या काळात खासगी रुग्णालयासाठी ही जागा देण्याच्या हालचालीही झाल्या. निविदाही आल्या, परंतु खासगी डॉक्टरांनी, संस्थांनी गांभीर्याने या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला नाही. (प्रतिनिधी)>वयोवृद्धांची प्रतीक्षा संपणारअजमेरा कॉलनीत स्वतंत्र रुग्णालय झाल्यास नेत्र रुग्णांची चांगली सोय होणार आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या विविध ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये जेथे सर्व आजारांवर उपचार केले जातात, अशा ठिकाणी गेल्यास रांगा लावूून थांबावे लागते. मोतीबिंंदू, काचबिंदू अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रियांसाठी येणारे रुग्ण प्रामुख्याने वयोवृद्ध असतात. त्यांना वायसीएम, तालेरा अशा रुग्णालयांमध्ये रांगा लावून थांबावे लागते. नेत्ररोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यास शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जातात. अशा प्रकारे होणारी रुग्णांची गैरसोय स्वतंत्र रुग्णालय झाल्यास टळणार आहे. >आधुनिक सोयी-सुविधानेत्ररुग्णांसाठी अत्याधुनिक अशी वैद्यकीय उपकरणे या रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नेत्रचिकित्सा, तसेच शस्त्रक्रिया आदी उच्च दर्जाच्या सुविधा या रुग्णालयात असतील. अजमेरा कॉलनीत २० खाटांचे नेत्र तसेच ३० खाटांचे अर्बन हेल्थ सेंटरसाठी अशी रचना असेल.