नागपूर : ‘लोकमत’च्या पुढाकाराने आणि शासन व प्रशासनाच्या सहभागाने आयोजित जागतिक संत्रा महोत्सवामुळे नागपूरचा संत्रा हा जागतिक पातळीवर पोहोचेल. त्याचे चांगले मार्केटिंग होऊन सर्वाधिक लाभ हा संत्रा उत्पादक शेतकºयांना होणार आहे. त्यामुळे या महोत्सवाबाबत अधिकाºयांसह संत्रा उत्पादक संघ व शेतकºयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी वनामती येथे आयोजित बैठकीत अधिकारी व संत्रा उत्पादकांमध्ये चर्चा झाली आणि संत्रा महोत्सवाबाबत अनेक महत्त्वाच्या सूचनाही आल्या.जागतिक संत्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अप्पर आयुक्त व वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक झाली. महाआॅरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, नागपूर संत्रा, फ्रुट, फ्लॉवर, व्हेजिटेबल उत्पादन सहकारी संस्था काटोलचे सचिव आणि आॅर्गेनिक शेतीचे पुरस्कर्ते मनोज जवंजाळ, सुधीर जगताप, मिलिंद राऊत, रणजित चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.१८ ते २१ जानेवारी दरम्यान नागपुरतील रेशिमबाग मैदानावर जागतिक संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदा शासन व प्रशासन यात पूर्णपणे सहभगी आहे. काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन सर्व कृषी विभागासह सर्व विभागांना या महोत्सवाच्या तयारीसंदंर्भात आवश्यकउपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.याअंतर्गत कृषी विभागातर्फे संत्रा उत्पादक संघाच्या पदाधिकाºयांची दुसरी बैठक वनामती येथे पार पडली. यात चांगली चर्चा झाली. अनेकांनी आपले विचार मांडले.देश विदेशातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन- संत्रा महोत्सवात देश विदेशातील तज्ञांचे मार्गदर्शन होईल. भव्य प्रदर्शन राहील. मनोरंजनासह प्रबोधनही होईल.- एकूणच संत्र्याचे जास्तीत जास्त मार्केटिंग करून तो लोकांपर्यंत जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. तेव्हा यात जास्तीत जास्त शेतकºयांनी सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती केली जाईल.- शेतकºयांना महोत्सवापर्यंत आणले जाईल, असा प्रयत्न करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला. लोकमतचे आतिष वानखेडे यांनी संत्रा महोत्सवाचे प्रेझेंटेशन सादर केले.
जागतिक संत्रा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना मिळणार नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 12:43 AM