- जितेंद्र ढवळे, नागपूरराज्यातील १ हजार १७ शाळांना नवा लूक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या शाळांच्या पायाभूत आणि तंत्रज्ञान विकासासाठी जवळपास १९ कोटींचा भरीव निधी अल्पसंख्याक विकास विभागाने मंजूर केला आहे.राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल, शासनमान्य खासगी अनुदानित-विनाअनुदानित, नगरपालिका, महानगरपालिका शाळा आणि अपंग विद्यार्थी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा शाळांचा लूक बदलवण्याचा संकल्प अल्पसंख्याक विभागाने केला आहे. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षासाठी १९ कोटी २३ लाख ६३ हजारनिधी मंजूर करण्यात आलाआहे. त्यानुसार खासगी अल्पसंख्याक संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना या शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांकरिता पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था, अद्ययावत प्रयोगशाळा आणितंत्रज्ञान विकासासाठी लागणाऱ्या विविध साधनांची खरेदी करतायेणार आहे.या शाळांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लागणाऱ्या निधीबाबतचे प्रस्ताव राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांच्या वतीने सरकारकडे पाठविण्यात आले होते. यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक २०५, ठाणे ११८, अमरावती १०३, अकोला ८२ आणि नागपूर जिल्ह्यातील ७२ शाळांची निवड करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
राज्यात १,०१७ शाळांना नवा लूक
By admin | Published: March 28, 2016 2:07 AM