शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दुहेरी हत्याकांडाच्या तपासाची जबाबदारी नव्या अधिकाऱ्याकडे

By admin | Published: December 25, 2015 4:23 AM

प्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरिश भंबानी यांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींची चौकशी करण्याची जबाबदारी आता तपासअधिकारी दिनेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

डिप्पी वांकाणी,  मुंबईप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरिश भंबानी यांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींची चौकशी करण्याची जबाबदारी आता तपासअधिकारी दिनेश कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दिनेश कदम यांनी यापूर्वी अजमल कसाब, अबू जुंदाल, यासिन भटकळ, मारिया सुसाईराज आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या प्रकरणात चौकशी केलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्याकांडाच्या कटात सहभागी असणाऱ्यांशी चिंतन हा आपल्या मोबाइलवरून बोलत नव्हता. तर अन्य मोबाइल वापरत होता. गुन्हे शाखेचे पोलीस सध्या चिंतनची चौकशी करत आहेत. चिंंतनने राजभरशी संपर्क साधतांना कायम वेगळ्या नंबरचे कार्ड वापरल्याचे दिसून येत आहे. कारण गुन्हे शाखेने या आरोपींच्या संपर्काचा डाटा जमा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना डाटा रेकॉर्ड मिळाला नाही.आतापर्यंतच्या चौकशीत चारही आरोपींच्या बोलण्यात भिन्नता आढळून आली आहे. त्यामुळे पोलीस शुक्रवारी त्यांची स्वतंत्रपणे चौकशी करणार आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विद्याधरला पकडण्यासाठी पोलिसांनी राजस्थानात एक पथक पाठविले आहे. विद्याधरला लवकरच पकडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. विद्याधरची आई आणि पत्नी यांना गुरुवारी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.चिंतन वकील बदलणार? : चिंतनची बाजू सध्या अ‍ॅड. सतीश मानशिंदे हे मांडत आहेत. मात्र चिंतन वकील बदलणार असल्याची चर्चा आहे. चिंतनच्या घटस्फोटाचे प्रकरण हाताळणारे अ‍ॅड. नितीन प्रधान हेच चिंतनची बाजू मांडणार असल्याचे कळते.