शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
5
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
6
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नव्या रेल्वे प्रकल्पांची उभारणी आॅगस्टपासून

By admin | Published: April 19, 2017 3:19 AM

राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन

मुंबई : राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. तर भूसंपादन होताच आॅगस्टपासून काम सुरू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी दिले. फडणवीस व प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी बेलापूर-सीवुड्स-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाणपुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मागार्ची निर्मिती, जळगाव उड्डाणपुलाचा प्रश्न, आर्वी-वरुड दरम्यान नवीन मागार्चे सर्वेक्षण, डीडीसीसीआयएलएल प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेचे १ लाख ३६ हजार कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती प्रभू यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी) हार्बर मार्गावर बारा डबा लोकल सुरु झाल्यानंतर या मार्गावरील दोन लोकलमधील वेळा कमी होतानाच प्रवाशांना झटपट लोकल मिळावी यासाठी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल यंत्रणा) या मार्गावर राबवावी, अशी राज्य सरकारची आग्रही भूमिका आहे. जवळपास ४,३00 कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडून नीती आयोग आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.सध्या मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आॅटो सिग्नल यंत्रणेबरोबरच ट्रॅक सर्किंट यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, ही यंत्रणा हाताळताना रेल्वेला बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे नवी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सध्या परदेशात रेल्वे मार्गांवर सिग्नलमधील सीबीटीसीसारखे उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येत असून त्यामुळे एकामागोमाग ट्रेनच्या फेऱ्या होणे, ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणे आदीसाठी मदत मिळत आहे. याचा फायदा होत असल्याने ही यंत्रणा हार्बरवर बसवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.