नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेषासाठी विजयादशमीचा मुहूर्त ठरविण्यात आलेला आहे. मात्र, हा गणवेष केवळ संघाच्या कार्यक्रमांसाठीच राहणार आहे. दैनंदिन शाखांमध्ये हाफपँट घालण्याचीही मुभा असेल, अशी माहिती विदर्भ प्रांत कार्यवाह दीपक तामशेट्टीवार यांनी दिली.नागौर येथे पार पडलेल्या संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची माहिती देण्यासाठी संघातर्फे टिळक पत्रकार भवन येथे पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. दीपक तामशेट्टीवार म्हणाले, ‘विजयादशमीला नागपुरातील रेशीमबाग मैदानात होणाऱ्या कार्यक्रमापासून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सर्व स्वयंसेवक नव्या गणवेषात दिसतील. संघाच्या दैनंदिन शाखांमध्ये हाफपँट कायम राहणार असून, विविध कार्यक्रम, तसेच पथसंचलनादरम्यान मात्र फुलपँट अनिवार्य असेल.’ नक्षलवाद शहरांत पोहोचला आहे. नक्षलवादापासून मुक्ती कशी मिळवता येईल, यााबत संघाकडून विचारमंथन सुरू आहे. संघाचे निवडक स्वयंसेवक याचा अभ्यासदेखील करत असल्याचे तामशेट्टीवार यांनी सांगितले.ओवेसीसारख्यांचीवृत्ती धोकादायकदेशात समरसता कायम राहण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, परंतु ‘भारत माता की जय’ म्हणण्यासाठी नकार देणारे असदुद्दीन ओवैसी यांच्यासारख्यांची मनोवृत्ती ही देशासाठी धोकादायक आहे. जो काही प्रकार सुरू आहे, तो दुर्दैवी असल्याचे मत दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केले.
केवळ संघाच्या कार्यक्रमांसाठीच नवा गणवेष !
By admin | Published: March 17, 2016 1:46 AM