शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
2
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
3
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
4
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
5
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
6
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
7
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
8
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
9
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
10
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
11
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
12
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
14
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर
15
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
16
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
17
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
19
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
20
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं

नव्याने टोल, रेतीवर जीएसटी; राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:45 AM

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार

- यदु जोशीमुंबई : राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही वाहनांवर नव्याने टोल सुरू करावा, परराज्यातून येणाऱ्या रेतीवर ३० टक्के जीएसटी आकारावा, शासकीय योजनांची पुनरावृत्ती बंद करून खर्चात कपात करावी यासह विविध उपाययोजनांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या २०२०-२१च्या अपेक्षित उत्पन्नात तब्बल १ लाख १२ हजार कोटी रुपयांची तूट येणार असून राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि ती सुधारायची तर कठोर उपाययोजना व निर्णय घ्यावे लागतील, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागाच्या सादरीकरणादरम्यान व्यक्त केले.राज्याच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे सादरीकरण आणि त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल अडीच तास चर्चा चालली. यंदाच्या आर्थिक वर्षात राज्याचे उत्पन्न ३ लाख ३४ हजार कोटी इतकी अपेक्षित होते मात्र ते २ लाख ३४ हजार कोटी रुपयांपर्यंत असू शकेल, असा अंदाज आहे. विविध विभागांच्या खर्चाला या आधीच कट लावण्यात आला आहे. गेल्या वर्षी मेमध्ये वित्त विभागाने असा आदेश काढला की, अर्थसंकल्पीय तरतुदींच्या केवळ ३३ टक्के निधी खर्च करावा आणि त्यात सर्व योजना बसवाव्यात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भांडवली खर्च ५० टक्‍क्‍यांपर्यंत करता येईल आणि नवीन योजनादेखील हाती घेता येतील, अशी सूट देण्यात आली.आगामी दोन महिन्यांत विविध विभागांना अत्यंत काटकसरीने खर्च करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. शासकीय योजनांवर होणारा खर्च आणि प्रत्यक्ष लाभार्थींना त्यापासून होणारा फायदा याचे परिणामकारक सनियंत्रण ठेवून निधीचा अपव्यय होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा वित्त विभागाने आग्रह धरला. काही प्रकारच्या वाहनांना सरसकट टोलमाफी देण्यात आली आहे, त्याचा पुनर्विचार करण्याची सूचना सादरीकरणात आली, असे सूत्रांनी सांगितले.जानेवारीपर्यंत राज्याचे उत्पन्न १ लाख ८० हजार कोटी इतके होते. त्यात फार तर ५० हजार कोटी रुपयांची वाढ होऊ शकेल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जीएसटीमध्ये ३५ हजार कोटी रुपयांची तूट अपेक्षित आहे. याशिवाय मुद्रांक शुल्क, उत्पादन शुल्क आणि परिवहन शुल्कात मोठी तूट येणार आहे.अन्य विभागांच्या खर्चात कपातगृह, आरोग्य यासारख्या अत्यावश्यक सेवांशी निगडित विभाग वगळता अन्य विभागांच्या खर्चात मोठा कट लावावा लागेल, असे वित्त विभागाकडून व्यक्त करण्यात आले. लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात आल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, मात्र ती पूर्णपणे रुळावर आलेली नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प