ठाणे : येत्या नवीन वर्षात ३ अंगारकी चतुर्थी, ४ ग्रहणे, ५ गुरुपुष्ययोग अशा धार्मिक व खगोलीय घटना घडणार आहेत. सुमारे २१ सुट्या या रविवारवगळता इतर वारी येत असल्याने चाकरमान्यांचीही चंगळ होणार आहे.नव्या वर्षाचा प्रारंभ एक सेकंद उशिराने होणार आहे. ३१ डिसेंबर २०१६ला ‘लीप सेकंद’ गृहीत धरले जाणार आहे. त्यामुळे त्या दिवशी रात्री १२ वाजल्यानंतर मध्ये एक सेकंद गेल्यावर २०१७ हे वर्ष सुरू होईल. पृथ्वीचा वेग मंदावत असल्याने हे घडत आहे. यापूर्वी ३० जून २०१५ रोजी ‘लीप सेकंद’ गृहीत धरले होते, अशी माहिती पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. गुढीपाडवा हा फाल्गुन अमावस्येच्या दिवशी २८ मार्च रोजी येत आहे. यानंतर, २०२६मध्ये तो पुन्हा अमावस्येच्या दिवशी असेल. २०१७मध्ये दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे आहेत. १० फेब्रुवारी आणि ७ आॅगस्टचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. मात्र, २६ फेब्रुवारी आणि २१ आॅगस्टचे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. गणेशभक्तांसाठी १४ फेब्रुवारी, १३ जून आणि ७ नोव्हेंबर रोजी अंगारकी चतुर्थीचा योग आहे. सुवर्णखरेदीसाठी १२ जानेवारी, ९ फेब्रुवारी, ९ मार्च, ९ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबर रोजी गुरुपुष्ययोग असणार आहे. (प्रतिनिधी)शिवराज्याभिषेक सोहळा यंदा दोन दिवसदरवर्षी रायगड किल्ल्यावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. सन २०१७मध्ये ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी ७ जूनला येत आहे. त्यामुळे पुढील वर्षी रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा ६ व ७ जून असे दोन दिवस असेल.गुरू-शुक्र ग्रह काही दिवस होणार लुप्तनव्या वर्षात गुरू ग्रह सूर्यतेजामध्ये लुप्त झाल्यामुळे १५ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात तर, शुक्र ग्रह २२ ते २६ मार्च व १६ डिसेंबर ते १ फेब्रुवारी २०१८पर्यंत लुप्त झाल्याने आपल्याला दिसणार नाही.सण ११ दिवस लवकरयंदाच्या तुलनेत मागील वर्षापेक्षा सर्व सण ११ दिवस लवकर येणार आहेत.- २०१७च्या आॅगस्ट, सप्टेंबर आणि आॅक्टोबर वगळता इतर ९ महिन्यांत मिळून सुमारे ७४ विवाह मुहूर्त आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री महावीर जयंती (९ एप्रिल), मोहर्रम (१ आॅक्टोबर) या तीन सुट्या वगळता इतर २१ सुट्या इतर वारी येत आहेत. त्यामुळे दुसरा व चौथा शनिवार सुटी असणाऱ्यांना फेब्रुवारी, मार्च, जून, आॅगस्ट, आॅक्टोबर आणि डिसेंबरमध्ये सलग तीन दिवस सुटीचा आनंद लुटता येईल. संयुक्त राष्ट्रसंघाने २०१७ हे वर्ष ‘इंटरनॅशनल ईअर आॅफ सस्टेनेबल टुरिझम फॉर डेव्हलपमेंट’ म्हणून जाहीर केले आहे.
नवीन वर्षात ३ अंगारकी, ५ गुरुपुष्ययोग आणि ४ ग्रहणे!
By admin | Published: December 27, 2016 6:30 AM