गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि त्यात असणारा तरु णांचा सहभाग लक्षणीय असतो.
मराठी नवीन वर्षाचे आजकाल ज्या पद्धतीने स्वागत केले जाते ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे
मराठी नवीन वर्षाच्या स्वागताला मुंबई आज सजली
गुढीपाडव्याची तयारी रंगात असताना गिरणगावात निघालेल्या पालखी सोहळ्याने खऱ्या अर्थाने मराठी संस्कृतीची झलक दाखवली.
हिंदू नववर्षाच्या पूर्वसंध्येला गिरणगावातील घोडपदेव परिसरात रंगलेल्या पालखी सोहळ्याने गुढीपाडव्याला चार चाँद लावले
भगव्या फेटयातील बुलेटवर स्वार झालेल्या तरुणी पारंपारिक मराठमोळया पोषाखात नटलेले तरुण-तरुणींचा अभुतपुर्व समावेश होता
चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवसापासूनच मराठी नववर्षाची सुरुवात होते.
गिरगाव भागात निघणा-या शोभा यात्रांबद्दल विशेष आकर्षण असते. दरवर्षी या शोभायात्रांमध्ये एक वेगळेपण जपण्याचा प्रयत्न होतो.
शोभा यात्रांची भव्यता त्यातून घडणारे संस्कृती परंपरांचे दर्शन मनाला भारावून टाकणारे आहे.
प्रमुख रस्ते चौक गल्लीबोळ या शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेल्या नागरीकांनी भरुन गेले
आज गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुंबईसह ठाणे डोंबिवली पुणे नाशिक अशा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये शोभा यात्रा निघाल्या आहेत.