ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 28: गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्कृती संवर्धन समितीतर्फे मंगळवारी सकाळी ७ वाजता राजराजेश्वराचे पूजन करून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रस्थानी पारंपारिक वेशभुषा आणि केसरी फेटे परिधान केलेली मातृशक्ती होती. शहरातुन निघालेल्या मोटारसायकल रॅलीचे शहरात ठिकठिकाणी सामाजिक व धार्मिक संस्थांनी स्वागत केले.
गुढीपाडव्यानिमित्त संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी मोटारसायकल रॅली काढण्यात येते. यंदाही मोटारसायकल रॅली राजराजेश्वर मंदिर येथुन काढण्यात आली. आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, आमदार गोपीकिसन बाजोरिया, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. आर.बी. हेडा, अॅड. मोतीसिंह मोहता, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, माजी महापौर उज्वला देशमुख, रा.स्व. संघाचे नगर संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, विप्लव बाजोरिया बाबासाहेब पाठक, गोपाल खंडेलवाल, शंतनु जोशी यांच्या प्रमुख उपस्थित मोटारसायकलीस प्रारंभ झाला. मोटारसायकलवर भगवे ध्वज हातात घेऊन आणि केसरी फेटे परिधान केलेले तरूणी, तरूणी, मातृशक्ती, ढोलताशांच्या गजरात निघाले. मोटारसायकल रॅलीच्या समोर भगव्या ध्वज आणि पताकांनी सजविलेला रथ होता.
ही रॅली टिळक रोड, जैन मंदिर, गांधी रोड, पंचायत समितीसमोरून, जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे अशोक वाटीका, मुख्य डाकघर, रालतो विज्ञान महाविद्यालय, अमानखॉ प्लॉट, रणपिसे नगर, राऊतवाडी, जठारपेठ चौक, सातव चौक मार्गाने मार्गक्रमण करीत बिर्ला राम मंदिरात पोहोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. मोटारसायकल रॅलीमध्ये पवन केडिया, प्रा. विवेक बिडवई, मोहन गद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, हरिश आलिमचंदानी, नगरसेवक राजेश मिश्रा, यांच्यासह इंद्राणी देशमुख, वैजयंती पाठक, शारदा बियाणी, चित्रा बापट, नगरसेविका किरण बोराखडे, गीतांजली शेगोकार, मनिषा भंसाली, कविता फाटे, भारती निम, आरती घोगलिया, डॉ. अशोक ओळंबे, दीपक मायी, प्रकाश घोगलिया, आशिष भिमजियानी, डॉ. प्रशांत मुळावकर, अजय शर्मा, डॉ. हेमंत जोशी, नरेंद्र राठी, नरेंद्र तापडिया, समीर गडकरी, मनिष शार्दुल, विष्णुपंत गुल्हाने, डॉ. तुषार वोरा, डॉ. राम हेडा, नरेश बियाणी, केशव खटोड, रमेश चांडक, विष्णु खंडेलवाल, प्रा. डॉ. विजय नानोटी, प्राचार्य सिकची, प्रा. श्रीप्रभु चापके, जगदिश मुंदडा, अतुल पिलात्रे, अनिल राठी, विजय पनपालिया, अनिल तापडिया सहभागी झाले होते. संकल्प प्रतिष्ठानच्या ढोलताशांचा गजरमंगलदिनी रॅलीमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या कलावंतांनी सहभाग घेत, ढोलताशे वाद्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. रॅलीमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या ढोलताशांच्या गजराने, आसमंत निनादुन गेला होता. मोटारसायकल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत रॅलीचेराममंदिर संस्थान, राणीसती धाम मंदिरातर्फे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रालतो विज्ञान महाविद्यालय, सीताबाई कला महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी रॅलीचे स्वागत केले. सिव्हील लाइन चौकात माजी नगरसेवक विजय जयपिल्ले यांनी, अमानखॉ प्लॉट येथे नगरसेवक आशिष पवित्रकार, रश्मि अवचार यांनी स्वागत केले. तसेच खंडेलवाल युवा संघटना, बारा ज्योर्तिलिंग मंदिराचे अध्यक्ष महादेवराव राऊत यांनी स्वागत केले. सातव चौकात नगरसेविका गितांजली शेगोकार, अॅड. धनश्री अभ्यंकर यांनी स्वागत केले. बिर्ला रोडवर राष्ट्रसेविका समिती, जलाराम मंदिर संस्थानतर्फे स्वागत करण्यात आले.व्हिडिओ,प्रवीण ठाकरे