आशिष गावंडे,
अकोला- नवजात अर्भकांचीही आता आधार कार्डसाठी नोंदणी करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. नवजात बालक संबंधित पालकांचे कितवे अपत्य आहे, हे विचारात घेऊन त्या क्रमांकाचे मूल(बेबी) अशी नावाविना नोंदणी करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने महापालिकांना दिले आहेत.सध्या पाच वर्षांखालील बालकांची आधार नोंदणी करताना बोटांचे ठसे आणि डोळ्यांतील बाहुलींची प्रतिमा यांची नोंद घेतली जात नाही. त्याऐवजी त्यांचे आधार क्रमांक त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जातात. त्यामध्ये बालकाचे नाव, जन्म-दिनांक आणि लिंग यांची माहिती नोंदविणे बंधनकारक आहे. यापुढे एक पाऊल टाकीतआता नवजात बालकांचीहीआधार प्रणालीत नोंद करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. >नाव अद्ययावत करणे शक्यमहापालिकांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणाली अंतर्गत नवजात बालकांची नोंद केली जाते. अशावेळी बाळाचे नाव निश्चित नसेल, तर मनपाच्या संबंधित यंत्रणेने विना नावे बाळाची आधार प्रणालीत नोंद करावी. कालांतराने संबंधित पालकांना संकेतस्थळाला भेट देऊन बाळाचे नाव अद्ययावत करता येईल. यामुळे लोकसंख्येचा अचूक आकडा उपलब्ध होण्यास मदत होईल. पालकांनी याबाबत जागरू क राहण्याची गरज असल्याचे मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सांगितले.