अकोला, दि. १३ : सहा आठवडे प्रदीर्घ उसंत घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील ४८ तासात राज्यातील काही भागासह विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. देशात पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिम मध्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या आंध्रप्रदेश किनारपट्टीवर आहे.दरम्यान, यावर्षी राज्यात सर्वत्र दमदार पाऊस पडला. ऑगस्टच्या प्रथम आठवड्यापर्यंत पाऊस सुरू च होता; पण गत सहा आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या ४८ तासात विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, १४ सप्टेंबर रोजी विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ सप्टेंबरला मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ सप्टेंबरला कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर १७ ला उत्तर कोकणात काही ठिकाणी मुसळधार तसेच दक्षिण कोकण-गोवा व उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात विशेषत: पुर्व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर विदर्भात बर्याच ठिकाणी, कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. तसेच खेड, माथेरान येथे प्रत्येकी ३0 मि.मी.(३ से.मी.), रोहा २, भीरा, चिपळूण, देवगड, कर्जत, खालापूर, मंडणगड, पोलदपूर, रत्नागिरी, वेगुर्ला १ प्रत्येकी व इगतपुरी १ से.मी. पाऊस पडला. मराठवाड्यात हदगाव, किनवट प्रत्येकी २, बिल्लोली, देगलूर, हिमायतनगर, उमारी १ प्रत्येकी.विदर्भात सावली, येथे ११0 मि.मी. (११ से.मी.), मूल ९ से.मी. म्हणजेच ९0 मि.मी, ब्रह्मपुरी,वणी, वरोरा प्रत्येकी ८, आरमोरी, बल्लारपूर, गोंडपिंपरी ७, आमगाव, अर्जुनी मोरगाव, गडचिरोली, कुही, जरी झामनी येथे प्रत्येकी ६, गोंदिया, कुरखेडा, लाखणी, मौदा, नागभीर, राजुरा, सडकअर्जुनी, शिंदेवाही, उमरेड प्रत्येकी ५ से.मी. , भिवापूर, चार्मोशी, चंद्रपूर, चिमूर, गोरेगाव, कोरपना, लाखांदूर, पौनी प्रत्येकी ४ से.मी, भद्रावती, देवोरी, जोईती, मारेगाव, पोम्भुर्णा, रामटेक, सालेकसा, तिरोरा प्रत्येकी ३ ,भंडारा, धानोरा, ईटापल्ली, मोहाडीफाटा, मूलचेरा, रामटेक प्रत्येकी २ से.मी., अहिरी, भामरागड, देसाईगंज, घाटंजी, हिंगणघाट, कळमेश्वर, कामठी, कोची, महागाव, मूर्तिजापूर, नागपूर, पांढरकवडा, समुद्रपूर, सेलू, सिरोंचा, उमरखेड येथे प्रत्येकी १ सेमी. घाटमाथ्यावर ता१िाणी ७, डुगरवाडी ३, भीरा, शिरगाव, अम्बोणे, दावडी, कोयना (पोफळी) येथे प्रत्येकी १ से.मी. पावसाची नोंद झाली आहे.
येत्या ४८ तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता !
By admin | Published: September 14, 2016 12:22 AM