पंढरपूर: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ही गोष्ट स्पष्ट केली आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोºहे यांनी शुक्रवारी पंढरपुरात व्यक्त केले.
मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. यावर गोºहे म्हणाल्या, आदित्य ठाकरेंवर कोणती जबाबदारी सोपवायची ते उद्धव ठाकरेच ठरवतील. ते विधिमंडळात आले तर त्यांचे स्वागतच करता येईल. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आमचा असेल, हे शिवसेनेच्या मुखपत्रातून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
पुढचा तपशीलही उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस काय ते मिळवून ठरवतील. पुढच्या एकादशीला युतीचा मुख्यमंत्रीच महापूजेला येईल. विधानसभा निवडणुकीत कोणाच्या किती जागा निवडून येतील, हे विठ्ठल-रुक्मिणीलाच माहीत, असेही त्या म्हणाल्या.
पंढरपुरात क्लॉक रूमची सुविधा हवीपंढरपुरात दर्शन रांगेत थांबलेल्या भाविकांसाठी लॉक रूम व्यवस्था अपुरी आहे. यात वाढ व्हावी, याबाबत मंदिर समितीला कळविण्यात येणार आहे. मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. स्वच्छतागृहांसाठी लोक जागा द्यायला तयार नाहीत. तरीही त्यातून मार्ग काढावा, असे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील, असेही नीलम गोºहे यांनी सांगितले.