राज यांची घोषणा : राष्ट्रीय पक्षांनी विधानसभा निवडणूक लढवू नये अशी भूमिका
मुंबई : प्रादेशिक पक्षांनी लोकसभा निवडणूक तर राष्ट्रीय पक्षांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, अशी भूमिका मांडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2019मधील प्रस्तावित लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केली.
मंत्रलय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने राज ठाकरे यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज म्हणाले की, राष्ट्रीय पक्षांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची गरज नाही. त्यांनी केवळ राष्ट्रीय राजकारण केले पाहिजे. आपण स्वत: कृतीतून तसा पायंडा पाडणार असून, पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपात दोन मतप्रवाह आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत विदर्भ वेगळा होता कामा नये. महाराष्ट्र राज्याला शिव्या देऊन येथील उद्योग गुजरातमध्ये नेणो योग्य नाही, असा टोला राज यांनी लगावला. राज्याच्या किरकोळ प्रश्नांकरिता सतत केंद्र सरकारकडे धाव घ्यायला लागावी हे चांगले लक्षण नाही. यामुळे अनेक प्रश्न, कामे रखडतात. राज्य सरकारला अशा निर्णयांबाबत स्वायत्तता हवी, असेही ते म्हणाले. देशाचा पंतप्रधान एका प्रांतापुरता मर्यादित असता कामा नये, असा चिमटा राज यांनी मोदींना घेतला.
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केल्याने उद्धव यांनी घाबरायला हवे. पवार यांनी शिव्या दिल्या तर मग निश्चिंत राहायला हरकत नाही, असे राज म्हणाले.
नाशिक महापालिकेत भाजपाने उपमहापौरपदावर दावा केला तर राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे त्यांचा पाठिंबा घेतला, असे राज यांनी स्पष्ट केले. राज्यातील महापालिकांमधील भाजपासोबतची सत्ता शिवसेना सोडत नाही कारण त्यांना आपले आर्थिक स्नेत सुरू राहावेत ही इच्छा आहे, असा आरोप राज यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)
निवडणूकपूर्व सव्रेक्षणांमागे अर्थकारण
वेगवेगळ्या वाहिन्यांमार्फत करण्यात आलेल्या निवडणूकपूर्व सव्रेक्षणांमागे अर्थकारण असल्याचा आरोप राज यांनी केला.