ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 16 - जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार बरसलेला पाऊस वर्दी देऊन काहीसा गायब झाला आहे. मात्र येत्या दोन दिवसांत राज्यभरात मान्सून सक्रिय होणार असल्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे. जून महिन्यात सरासरीपेक्षा 57 टक्के पावसाची नोंद झाली आहे. येत्या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसेल, असा अंदाजही कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील सर्व भागांत मुसळधार पाऊस कोसळेल, असंही कुलाबा वेधशाळेने अंदाज वर्तवला आहे. मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाल्यानं कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान काल 15 पर्यंत जून महिन्यातील एकूण पावसापैकी 57 टक्के पाऊस पडला असून, यापैकी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांत 70 टक्के पाऊस पडल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूनने ढग दाटून आल्यानं येत्या काही दिवसांत पाऊस जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक कोसळेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
येत्या दोन दिवसांत राज्यभरात कोसळधार
By admin | Published: June 16, 2017 11:41 PM