मुंबई - सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणारे प्लॉट अंतिम झाले आहेत. तर प्लॉटची मोजणी सुद्धा झाली असून पुढील आठवड्यात प्लॉट वाटप करणार असल्याची माहिती गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी दिली आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना मिरगणे म्हणाले की, या आधी सुद्धा अनेकदा राज्यावर नैसर्गिक संकट आले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये ज्या वेगाने पुनर्वसनाचे काम सुरु आहेत, ते याआधी कधीच झाले नसावेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे ही जवाबदारी देताना तीन महिन्याच्या आत पूरग्रस्तांना प्लॉट वाटप करून, बांधकाम सुरु झाले पाहिजे अशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे मी आणि प्रशासनाचे अधिकारी लगेच कामाला लागलो. आणि आज हे काम अंतिम टप्यात आहे.
यासाठी आम्ही सांगलीमधील सर्वात जास्त पुराचा फटका बसलेल्या भिलवडी आणि भ्रमनाळ हे गाव आधी निवडले. या गावातील मोजणी पूर्ण झाली असून प्लॉट सुद्धा निश्चित झाले आहेत. तसेच पुढील आठवड्यात या गावतील पूरग्रस्तांना प्लॉटचे वाटप सुद्धा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री यांनी आम्हाला तीन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र आम्ही हे दोन महिन्यातच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा सुद्धा मिरगणे यांनी यावेळी केला.
आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी पूर आले आहेत. त्याठिकाणी आरोग्याचा मोठा सामना प्रशासनाला करावा लागला असल्याचे आपण पहिले आहेत. मात्र सांगली-कोल्हापूरमध्ये आम्ही हे होऊ दिले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जलदगतीने स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने या भागात रोगराईचा प्रश्न निर्माण झाला नाही, असेही मिरगणे म्हणाले.
पूरग्रस्तांमध्ये आमच्याबद्दल रोष नाहीच.
आगामी विधानसभा निवडणुकीत सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराचा फटका तुम्हाला बसणार असल्याचा दावा होता असल्याचा प्रश्नाला उत्तर देताना मिरगणे म्हणाले की, मला वाटत आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केले आहेत. सांगली-कोल्हापूरमध्ये ज्याप्रमाणे आम्ही पूरग्रस्तांसाठी धावून गेलो आहेत, त्याने लोकांमध्ये आमच्याबद्दल चांगली भावना आहे. त्यामुळे आमच्याबद्दल लोकांच्या मनात रोष नाही, हे माझे अनुभूव असल्याचे मिरगणे म्हणाले.