लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर उर्फ साध्वी हिला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर, साध्वीने या खटल्यातून आरोपमुक्तता करण्यासाठी विशेष एनआयए न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर हरकत नसल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी सांगितले. गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने साध्वीचा जामीन मंजूर केला. प्रथमदर्शनी बॉम्बस्फोटाच्या कटात ती सहभागी नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यानुसार, साध्वीने विशेष एनआयए न्यायालयात आरोपमुक्तीसाठी अर्ज केला. त्यावर एनआयएने उत्तर दाखल केले. ‘तपास यंत्रणेच्या भूमिकेनुसार, साध्वीच्या अर्जावर त्यांना आक्षेप नाही,’ असे एनआयएचे वकील अविनाश रसाळ म्हणाले. एटीएसने साध्वीसह अन्य ११ जणांना अटक करत दोषारोपपत्र दाखल केले. २०११मध्ये एनआयएकडे प्रकरणाचा तपास वर्ग झाला. एनआयएने केलेल्या तपासात एटीएसने केलेला तपास योग्य नसल्याचे आढळले.
साध्वीच्या आरोपमुक्ततेस एनआयए अनुकूल
By admin | Published: May 13, 2017 2:34 AM